गेवराई दि 1 ( वार्ताहार ) बीड लोकसभा निवडणूक जाहिर झाली असून येत्या 13 मे रोजी यासाठी मतदान होनार आहे बीड लोकसभा निवडणूकीच्या आखाड्यात 40 जन उतरले असून मुख्य लढत भाजपाच्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे,वंचित आघाडीचे अशोक हिंगे यांच्यात तिंरगी लढत होणार आहे बीड जिल्ह्यात गेवराई मतदार संघात विषेश लक्ष राहणार असून हा मतदार संघ विजयी उमेदवार आघाडी देणारा आहे या ठिकाणी भाजप चे वर्चस्व आहे स्थानिक आ लक्ष्मण पवार ,महायुती मित्र पक्षातील राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे प्रदेश सरचिटणीस मा आ अमरसिंह पंडित यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पनाला लावली आहे बंजरग सोनवणे पेक्षा जास्त मताधिक्य वंचित च्या उमेदवाराला मिळेल अशी परिस्थिती आहे मुठभर कार्यकर्ते यांच्या जिवावर गेवराई मतदार संघात बप्पाची बजरंगी उडी आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,देशात भाजप वर जरी मतदार नाराज असला तरी बीड लोकसभा निवडणूकीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर मतदार नाराज नाही स्व गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्याई त्यांच्या सोबत आहे तसेच याठिकाणचे दोन्ही शिवछत्र परिवार आणि पवार परिवार हे वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत त्यांचा दोघांचा प्रामाणिक हेतू पंकजा मुंडे यांना मोठ्या मताची आघाडी देण्याचा आहे तसेच गेवराई मतदार संधात या दोन्ही गटाबरोबरच शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांना देखील माननारा मोठा वर्ग आहे बजरंग सोनवणे यांना जे काही मताधिक्य या मतदार संघातून मिळेल यांचे संपुर्ण श्रेय हे माजी मंत्री बदामराव पंडित यांना जाईल कारण याठिकाणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते नाहीत या गटाचा तालूका अध्यक्ष याला मतदारसंघ देखील माहिती नाही आणि ज्यांनी स्व;च्या स्थार्थासाठी प स च्या निवडणूक लढवून चार पक्ष बदलले आणि आता या निवडणूकी दरम्यान आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे असे लोक बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात सक्रीय आहेत यामुळे या मतदार संघात पक्ष नसून पंडित – पवार हेच पक्ष आहेत म्हणून बजरंग सोनवणे यांची अपेक्षा भंग होईल व पंकजा मुंडे यांना चांगल्या मताची आघाडी गेवराई मतदार संघातून मिळेल अशी चर्चा मतदार संघात आहे.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...