गेवराई दि 30 ( वार्ताहार ) तालूक्यातील अवैध वाळू तस्करी प्रकरणी अनेक गून्हे गेवराई पोलिसांत दाखल आहेत तसेच या प्रकरणातील मुद्देमाल जमा असलेले अनेक ट्रॅक्टर केनीसह अर्थिक? तडजोडीतून सोडून दिले असल्याची खात्रीलायक माहिती असून ऐवढंच नाहीतर न्यायलयाने नामंजूर करण्यात आलेल्या प्रकरणातील मुद्देमाल गायब कसा?झाला यांची चौकशी होणे गरजेचं आहे गेवराई पोलिस ठाण्यावर वरिष्ठांचा अंकूश राहिला नाही की काय?असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गूरनं 283/2023 या गून्ह्यात पोलिसांनी हिंगणगाव परिसरात छापा टाकून एक ट्रॅक्टर केनीसह पकडले होते तसेच काहींनी पलायन केले होते या गून्ह्यात तपासात एकूण सहा ट्रॅक्टर व केन्या जप्त करण्यात आल्या होत्या परंतू ट्रॅक्टर ताब्यात मिळण्यासाठी आरोपीने न्यायालयात धाव घेतली परंतू न्यायालयाने ते प्रकरण फेटाळले तसेच या गंभीर प्रकरणातील मुद्देमालाला अचानक पाय फूटले आणि हा मुद्देमाल अर्थिक? तडजोतीत परत दिला असल्याची माहिती असून हा प्रकार नेमका काय?आहे असे ही घडू शकते परंतू हे कोणी?केले व कूणाच्या सांगण्यावरून हा मुद्देमाल परत केला ऐवढंच नाहीतर पाच ट्रॅक्टरला कागदपत्रे देखील नाहीत त्यामूळे गेवराई पोलिस ठाण्यात नेमकं चाललयं तरी काय?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे गेवराई पोलिस ठाण्यात काही दिवसांपासून हम करे सो कायदा असा प्रकार सुरू आहे अनेक गंभीर गून्ह्यातील लाखों रूपयाचा मुद्देमाल स्वत;च्या फायद्यासाठी नियमाचे भंग करूण सोडून देण्यात येत आहे.वरिष्ठ अधीकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे.तसेच यासह अन्य दूसऱ्या गून्ह्यातील देखील मुद्देमाल कार्यवाई विनाच ताब्यात देण्यात आलेला आहे यासर्व प्रकरणाची चौकशीची मागणी आता होऊ लागली आहे प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.