सातबाऱ्याला नाव लावण्यासाठी सहा हजाराची मागतली लाच
तलाठी सानप एसीबीच्या जाळ्यात
गेवराई दि 24 ( वार्ताहार ) तालुक्यातील संगम जळगाव याठिकाणी नावावर असनाऱ्या जमिनीवर सातबाऱ्याला नाव लावण्यासाठी गेवराई येथील तलाठी राजाभाऊ बाबूराव सानप यांना आज ( दि 24 एप्रिल ) रोजी गढी या ठिकाणी एसीबीने पकडले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, संगम जळगाव गट क्रं 35/3 मध्ये तक्रारदार यांची जमिन आहे तसेच यावर सातबाऱ्याला नोंद घेऊन नाव लावण्याकरीता लोकसेवक तलाठी राजाभाऊ बाबूराव सानप यांनी ( दि 21 एप्रिल ) 6000 हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली तसेच त्यांना आज ( दि 24 एप्रिल ) रोजी गढी याठिकाणी खाजगी कार्यलयात एसीबीने रंगेहात पकडले आहे सदरच्या कार्यवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे सदरची कार्यवाई पोलिस अधीक्षक मुंकूद आघाव ,उप अधीक्षक शंकर शिंदे,छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गूलाब बाचेवाड,श्रिराम गिराम,हनूमान गोरे, भरत गारदे, अमोल खडसाडे, अविनाश गवळी, स्नेहलकूमार कोरडे,अंबादास पुरी सर्वे लाच लूच प्रतिबंधक विभाग बीड यांनी केली आहे