पोलिस हवालदार बांगर समवेत अमोल सोनवणे एसीबीच्या जाळ्यात
गेवराई दि 22 ( वार्ताहार ) गून्हा दाखल न करण्याच्या मागणी वरूण तलवाडा येथील हवालदार बांगर व पोकॉ अमोल सोनवणे या दोघासह एक खाजगी ईसम एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत तसेच या प्रकरणी रात्री तलवाडा पोलिसांत रात्री गून्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या वरील दोन कर्मचारी यांनी पंदरा हजार रुपये लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले आहे तर पोकॉ अमोल सोनवणे यांचा सहभाग या गून्ह्यात तपासात समोर आला असून गेवराई शरातील ताकडगाव रोडवरून त्याला ( आज दि 22 एप्रिल ) रोजी एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार आणि त्यांचा भाऊ यांच्यात ( दि 15 एप्रिल ) रोजी झालेल्या भांडनातून गून्हा न दाखल करण्यासाठी तलवाडा पोलिस ठाणे येथे कार्यरत असनारे पोलिस हवालदार हरीभाऊ बांगर यांनी खाजगी ईसम यांच्यामार्फत 15 हजार रूपयांची लाचेची मागणी केली यावरून ( दि 22 एप्रिल ) रोजी यमाई मंदिर परिसरात खाजगी ईसम याला रंगेहात पकडले तसेच सदर गून्ह्या तलवाडा पोलिस ठाण्याचा आणखी एक कर्मचारी अमोल सोनवणे यांचा देखील सहभाग असल्याची माहिती एसीबी यांच्या कर्मचारी यांनी दिली आहे तसेच त्याला आज रोजी गेवराई शहरातील ताकडगाव येथील राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले आहे सदरच्या कार्यवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.सदरची कार्यवाई संदीप आटोळे पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर,मुकूंद आघाव अप्पर पोलिस अधीक्षक संभाजीनगर,यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर शिंदे उप अधीक्षक बीड पोनि शेख ईनूस,श्रिराम गिराम,अमोल खरसाडे,अंबादास पुरी,अविनाश गवळी,भरत गारदे,हनूमान गोरे,सुरेश सांगळे,संतोष राठोड,स्नेहलकूमार कोरडे सर्व लाचलूच प्रतिबंधक विभाग बीड यांनी केली आहे.