आम्ही तूमचे सच्छे आणि सख्खे नाहीत परंतू त्याच्यापेक्षा जास्त तूमच्या पदरात टाकू – अमरसिंह पंडित
पंकजाताई साठी मतदार संघातल्या प्रत्येक चौकटीवर जाईल
गेवराई दि 19 ( वार्ताहार ) बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्यासाठी गेवराई मतदार संघातील प्रत्येक चौकटीवर जाईल तसेच आम्ही तूमचे सच्चे आणि सख्खे ही नाहीत परंतू त्यांच्या पेक्षा जास्त मतदान आम्ही तूम्हाला देऊ यानंतर तूम्ही आम्हाला वचन द्या गेवराई तालुक्याती सिंचन प्रश्न मार्गी लाऊन माझ्या मतदार संघातला शेतकरी समाधानी झाला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ अमरसिंह पंडित यांनी केले आहे.
बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा व महायुतीच्या उमेदवार पंकजा गोपिनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री धंनजय मुंडे ,माजी मंत्री लोकसभा उमेदवार पंकजाताई मुंडे,मा जिप अध्यक्ष विजयसिंह पंडित,रणविर अमरसिंह पंडित ,रासपचे परमेश्वर वाघमोडे, सभापती मुजिब पठाण,हभप नागरे महाराज यांची प्रमुख उपसस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की गेवराई मतदार संघात उस उत्पादक शेतकरी भरपूर आहे पण पाण्याअभावी अनेक शेतकरी हवालदिल आहे साखळी बंधारे तसेच बॅरेजेसची निर्मीती करावी जेणेकरून भविष्यात ईथला शेतकरी समाधानी होईल आम्हाला तूमच्या खासदार फडातून रस्ते नाली अथवा विकास कामांना निधी नको परंतू माझ्या मतदार संघातल्या शेतकरी यांचा सिंचनाचा प्रश्न तूम्ही सोडवा तसेच तूमच्या साठी गेवराई मतदार संघातील प्रत्येक चौकटीवर जाऊन मी मतदान मागेल तसेच ऐकदा शिवछत्र परिवाराने शब्द दिला की त्या शब्दाला कदापी तडा आम्ही जाऊ देत नाहीत तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवला आहे आम्ही तूमचे सच्चे नाहीत तसेच सख्खेही नाहीत आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहोत तूम्हाला सख्या पेक्षाही जास्त मताची आघाडी देऊन तूम्हाला देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवू हा शब्द गेवराई करांच्या वतीने मी तूम्हाला देतो तसेच येणाऱ्या 13 मे ला कुठल्याही अफवांना बळी न पडता बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा च्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मतदान करा असे अवाहनही त्यांनी शेवटी केले.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...