विस हजार वह्यातून साकारले डॉ बाबासाहेब आंबेडकर

रणविर पंडित यांच्या संकल्पनेतून उद्देश पघळने साकारली प्रतिकृती

गेवराई दि 13 ( वार्ताहार ) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती 14 एप्रिल रोजी जगात साजरी केली जाते याच जंयतीच औचित्यसाधून गेवराई भीमजोती जन्मोत्सह समितीचे अध्यक्ष रणविर अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून विस हजार वह्यापासून मोठ्या मैदानात उद्देश पघळ नावाच्या कलाकाराने ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारली असल्याने ती पहाण्यासाठी अलोट जनसागर लोटला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरात गेल्या चाळीस वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फूले यांची संयूक्त जंयती साजरी करण्याची परपंरा आहे तसेच या सार्वजानिक जंयती उत्सव समितीचा अध्यक्ष हा ईतर समाजाचा असतो हे या जंयती उत्सव समितीचा नियम आहे तसेच सन 2024 या वर्षीचा जंयती उत्सव समितीचा अध्यक्ष होणाचा बहूमान हा माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे चिंरजिव रणविर पंडित यांना मिळाला आहे तसेच गेल्या आठवडाभरापासून व्याखान आणि नामाकिंत आर्केस्ट्रा चे कार्यक्रम यानिमित्ताने पहावयास मिळत आहेत तसेच यावर्षी भीमजोती जन्मत्सोव समितीचे अध्यक्ष रणविर पंडित यांनी विस हजार वह्यापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची हूबेहूब प्रतिकृती करण्याचा निर्णय घेतला तसेच कलाकार उद्धेश पघळ या मातीतल्या कलाकारानेे ही प्रतिकृती विस हजार वह्यापासून तयार केली आहे ही प्रतिकृती रभ अट्टल महाविद्यालयाच्या प्रागनांत साकारली आहे तसेच आगळ्यावेगळ्या पध्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज दिवसभर याठिकाणी अनूयायी यांची मोठी गर्दी झाली होती व रणविर पंडित यांच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *