अवैध दारू विक्री प्रकरणी दोन हॉटेलवर गेवराई पोलिसांची कार्यवाई
गेवराई दि 13 ( वार्ताहार ) गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील धोंडराई परिसरातील दोन हॉटेलवर गेवराई पोलिसांनी छापा मारला यामध्ये हजारो रूपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली असून एक आरोपीच्या मुसक्या गेवराई पोलिसांनी आवळल्या आहेत.तसेच ही कार्यवाई ( दि 13 रोजी ) करण्यात आली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, धोंडराई परिसरात हॉटेल जोती व तूळजाई या दोन हॉटेलवर विनापरवाना अनाधीकृत विदेशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती गेवराई पोलिस ठाण्याचे प्रमुख प्रविणकूमार बांगर यांना गूप्त बातमीदाराने दिली तसेच सदर ठिकाणी पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांनी आपले पथक त्याठिकाणी पाठवून कार्यवाईचे आदेश दिले सदर ठिकाणी पोलिस पथकाने खातरजमा करून सदरच्या दोन्ही हॉटेलवर छापा मारला तसेच याठिकाणावरून हजारो रूपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली असून एक आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गून्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर ,उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू,पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक लंके, सपोनि संतोष जंजाळ,पोउपनि शिवाजी भूतेकर,पोह दत्तू उबाळे,राठोड,उगलमुगले यांनी केली आहे.