January 22, 2025

डीसीबल मर्यादा ओलाडनाऱ्या डिजेवर गून्हा दाखल करनार

उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांची माहिती

गेवराई दि 9 ( वार्ताहार ) सन उत्सव निमित्ताने मोठ्या प्रमानात ध्वनिप्रदूषन यांचा परिनाम जेष्ठ नागरिक,लहान मुले,महिला व पुरूष यांच्यावर होतो क्षमतेपेक्षा जास्त आवाज कानावर पडल्याने अनेकांना आपल्या जिवानिशी जावे लागते अश्या घटना यापुर्वी लक्षात आल्या असून यांच्यावर पोलिस प्रशासनाचा अंकूश आहे प्रशासनाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषन करनाऱ्या डिजेवर थेट गून्हा दाखल करण्यात येईल.तसेच ती सामग्रीही जप्त करण्यात येईल अशी माहिती गेवराईचे उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांनी दिली आहे तसेच याबाबद अनेकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,मा सर्वोच न्यायालय यांच्या निर्देशानूसार तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम सन 1986 सह ध्वनीप्रदूषन विनियमन व नियत्रंण नियमावली 2000 चे अन्वये ध्वनिक्षेपक लाऊडस्पिकर,संगित,वाद्य,व ईतर वाद्याचा वापर शासनाने विषेश वेळी एका कॅलेंडर वर्षात 15 दिवस रात्री 22:00 वा ते 24:00 दिलेली सवलत खेरीज करून ईतर दिवशी दररोज संध्याकाळी 06:00 ते 22:00 पवोतो येईल.तसेच या कायद्याअन्वे ध्वनिक्षेपक, लाऊडस्पिकर वाद्याचा वापर हा शांतता क्षेत्र वगळून ईतर ठिकाणी खालील नूमुद क्षेत्रानूसार मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात येऊ नये ( दिवसा )06:00 ते 22:00 वाजता (अ) अद्योगिक क्षेत्र 75 डीबी ऐ एलईक्यू ( ब ) व्यापारीक्षेत्र 65 डी बी ऐ एलईक्यू ( क ) निवासीक्षेत्र 55 डी बी ऐ एलईक्यू ( ड ) शांतताक्षेत्र 55 डी बी ऐ एलईक्यू रात्री 22:00 ते 24:00 वाजता (अ ) 70 डी बी ए एलईक्यू ( ब ) 55 डी बी ए एलईक्यू ( क )45 डी बी ए एलईक्यू ( ड ) 40 डी बी ए एलईक्यू सदर सण उत्सवावा निमित्त वापरण्यात येेनाऱ्या ध्वनिक्षेपक, व लाऊडस्पिकर व ईतर वाद्य कायद्याचे उलंघन करील व ठरऊन दिलेल्या डीसीबल मर्यादा ओलाडेल अश्या व्यक्ती विरोधात तात्काळ गून्हा दाखल करण्यात येईल व ती सामग्री जप्त करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे अश्या सुचना देखील,गेवराई ,तलवाडा,चकलांबा ठाणे यांना देण्यात आल्या असल्याचेही उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *