January 22, 2025

विस हजार वह्यातून साकारनार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती

भिमजोती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रणविर पंडित यांची माहिती

गेवराई दि 6 ( वार्ताहार ) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून भव्यदिव्य विस हजार वहीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती तयार करण्यात येणार असून अगळ्या वेगळ्या पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती भिमजोती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रणविर पंडित यांनी दिली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी भिमजोती जन्मोत्सव समितीची कार्यकारणी उपस्थित होती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फूले यांची जंयती गेल्या तिस वर्षापासून गेवराई शहरात एकाच दिवशी साजरी करण्यात येत आहे तसेच ( दि 7 एप्रिल ) रोजी सकाळी 9 वा धम्मभूमि शिवणी येथील भिक्खू धम्मशिल थेरो यांच्या धम्म देसनाने जंयती सोहळ्याचा प्रारंभ होईल तसेच सायं 7 वाजता सुप्रसिद्ध गायक वैभव खूणे यांचा भव्य गिताचा कार्यक्रम जैतवन बौद्ध विहार याठिकाणी होईल.तसेच ( दि 8 एप्रिल ) रोजी सायकांळी 7 वाजता व्याख्याते प्रा लूलेकर यांचे व्याखान होईल तसेच ( 9 एप्रिल ) रोजी सकाळी 10 वाजता उपजिल्हा रूग्णालयता फळ वाटप व रक्तदान शिबीर होईल.व संध्याकाळी 7 वाजता प्रा सुकूमार कांबळे यांचे व्याख्यान होईल ( दि 10 एप्रिल ) रोजी सकाळी 10 वाजता वृक्षारोपण व संध्याकाळी 7 वाजता प्रा सुशिलाताई मोराळे यांचे व्याखान होईल रात्री 8 वाजता सुभम म्हस्के यांचा भिम गिताचा कार्यक्रम होईल ( दि 11 एप्रिल ) रोजी क्रांतीसुर्य जोतिबा फूले यांच्या जंयती निमित्त अभिवादन सभा होईल.व रात्री 7 वाजता व्याख्याते राहूल गिरी यांचे व्याख्यान होईल.( दि 12 एप्रिल ) रोजी रात्री 7 वाजता अभिजीत कोसंबी यांचा भिमगितांचा कार्यक्रम होईल( दि 13 एप्रिल ) रोजी 10 वाजता विस हजार वह्यापासून साकारलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिकृती यांचे उदघाटन मा आ अमरसिंह पंडित यांच्याहस्ते होईल ( दि 14 ) रोजी सकाळी 9 वाजता ध्वजारोहन व सायकांळी 5 वाजता भव्य मिरवणूक निघेल तसेच ज्या वह्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे त्या कलाकाराचे नाव उद्धेश पघळ आहे तसेच या वह्या ग्रामिण भागातील गरजवंत विद्यार्थी यांना वाटप करण्याचा मानस भिमजोती जन्मोत्सव समितीचा आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *