गेवराई दि 31 ( वार्ताहार ) रेवकी ग्रामपंचायतची चौकशी सुरू असतांना माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे समर्थक व बाळासाहेब मस्के यांच्यात हाणामारी झाली असल्याची घटना घडली होती या प्रकरणी गेवराई पोलिसांत बाळासाहेब म्हस्के व मयुरी मस्के यांच्यासह दोघाविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,रेवकी ग्रामपंचायतीवर बीआरएस पक्षाचे नेते बाळासाहेब मस्के यांचे वर्चस्व आहे त्यांच्या मातोश्री या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत तसेच सदर ग्रामपंचायत कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला असल्याची तक्रार माजी जिप अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी बीड जिल्हा परिषदेत केली होती त्या तक्रारीच्या अनूषंगाने सदर ग्रामपंचातची चौकशी करण्यासाठी व्हि एम सासवडे शाखा अभियंता गेवराई यांच्या अध्यक्षतेखाली बारा लोकांची समिती नियुक्त करण्यात आली होती तसेच ( दि 29 मार्च ) रोजी ही समिती रेवकी ग्रामपंचायत कार्यलयात गेली होती सदर ठिकाणी मुळ संचिका दाखवा असा आग्रह रेवकी गावातील माजी अध्यक्ष विजयसिंह यांचे समर्थक गोकूळ चोरमले यांनी घरला तसेच बाळासाहेब मस्के व त्यांचे समर्थक एकमेकांना भिडले याठिकाणी दगडफेकही झाली तसेच गोकूळ चोरमले यांना मोठ्या प्रमाणात ईजा झाली होती तसेच त्यांनी याबाबद गेवराई पोलिसांत फिर्याद दिली असून त्यांच्या तक्रारीवरूण बाळासाहेब भगवान म्हस्के,मयुरी बाळासाहेब मस्के यांच्यासह दोन आरोपी विरूद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गून्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शिवाजी भूतेकर हे करत आहेत.