गेवराई दि 29 ( वार्ताहार ) रेवकी च्या ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामात भ्रष्ट्राचार झाला असल्याची तक्रार विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषदेत केली होती तसेच त्याअनूषंगाने पंचायत समिती गेवराईचे चौकशी समिती रेवकीत गेल्यानंतर विजयसिंह पंडित यांचे समर्थक गोकूळ चोरमले व बीआरएस चे नेते बाळासाहेब म्हस्के यांच्या समर्थकात तूबंळ हाणामारी झाली असल्याची माहिती आहे तसेच ही घटना आज ( दि 29 मार्च ) रोजी दूपारी दोनच्या दरम्यान घडली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,रेवकी ग्रामपंचायत ही बीआरएस पक्षाच्या ताब्यात आहे तसेच बाळासाहेब म्हस्के यांच्या मातोश्री ह्या विद्यमान सरपंच आहेत तसेच या ग्राम पंचायतीत अनियमीतता तसेच अनेक रस्ते व ईतर कामात भ्रष्ट्राचार झाली असल्याची तक्रार माजी जिप अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती त्याच अंनूषगाने गेवराई पंचायत समितीची चौकशी समिती आज ( दि 29 मार्च ) रोजी दूपारी दोनच्या दरम्यान रेवकीत गेली असता गोकूळ चोरमले व त्यांचे सहकारी यांनी चौकशी समिती समोर बाळासाहेब मस्के यांच्यात हूज्जत घातली व यांचे रुपातंर दगडफेकीत झाले बाळासाहेब म्हस्के यांच्या समर्थकात हाणामारी झाली असल्याची माहिती असून यामध्ये गोकूळ चोरमले यांच्या डोक्याला ईजा झाली असल्याची माहिती असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच अद्यापर्यंत यामध्ये गून्हा दाखल झाला नाही.तसेच चौकशी समितीच्या अध्यक्षा अभियंता सासवडे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.