ड्राय डे च्या दिवशी अवैध दारू विक्री करनाऱ्यांवर गून्हा
सपोनि नारायण एकशिंगे यांची कार्यवाई
गेवराई दि 25 ( वार्ताहार ) आज धूलिवंदनाच्या दिवशी ड्राय डे असतांना अवैध दारू विक्री करनाऱ्या दोन जणाविरूद्ध चकलांबा पोलिसांनी कार्यवाई केली असून यामध्ये हजारो रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गून्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की,आज ( दि25 ) रोजी ड्राय डे आहे तसेच धूलिवंदन देखील कायदा व सुवैस्थेच्या अनूषगांने चंकलाबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि नारायण एकशिंगे आपल्या पथकासमवेत गस्त घालत असताना तांदळा रोडवरील सार्थक हॉटेल याठिकाणी अनाधीकृत विनापरवाना दारूची विक्री केली जात आहे तसेच राक्षसभूवन याठिकाणच्या एका पत्राच्या शेडमध्ये दारू विक्री होत आहे अशी माहिती गूप्त बातमीदाराने दिली तसेच सदर ठिकाणी सपोनि नारायण एकशिंगे यांनी छापा मारला व याठिकाणा वरूण हजारो रुपयांची देशी विदेशी दारू मिळून आली व संदिपान सिताराम शेंबडे ( वय 38 वर्ष )राहणार तांदळा तसेच राजेंद्र उर्फ नाना नाटकर ( वय 43 ) राहणार राक्षसभूवन तालुका गेवराई जिल्हा बीड या दोघांना ताब्यात घेतले असून यांच्या विरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला असुन सदरची कार्यवाई पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर , अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी नारायण एकशिंगे,पोउपनि इंगळे ,पोउपनि कुमावत,पो कॉ खटाणे,चालक जमादार यांनी केली आहे.