गेवराई दि 23 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग वर असनाऱ्या तिन धाब्यासह गैबी नगर तांड्यावरील एका हादभट्टीच्या साठ्यावर चकलांबा पोलिसांनी छापा मारला तसेच यामध्ये देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे तसेच या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गून्हा दाखल करण्यात आला
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत हायवेवरील तिन धाब्यावर कुठलीही शासकीय परवानगी नसतांना अनाधीकृत देशी विदेशी दारूची विक्री काही धाब्यावाले करत आहेत अशी माहीती गूप्तबातमी दाराने चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि नारायण एकशिंगे यांना दिली त्यानी तात्काळ आपले पथक त्याठिकाणी पाठवून सदरच्या तिनही धाब्यावर छापा मारला तसेच गैबी नगर तांड्यावर हादभट्टी रसायन नावाची देशी दारू हीचा अड्डा देखील उदवस्त करण्यात आला असल्याची माहिती सपोनि नारायण एकशिंगे यांनी दिली असून या प्रकरणी गोरख आसाराम जोगदंड,सतिष बाबासाहेब आहेरकर,दोघे राहणार कोळगाव,रोहित दिलीप तूळवे,राहणार पेंडगाव,संतोष किसन जाधव यांना अटक केली असून यांच्याविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाई पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागिय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नारायण एकशिंगे,पोउपनि रामेश्वर इंगळे,पोउपनि कूमावत,पोह अमोल येळे,पोशी खटाणे, पोशी सुरवसे,पोह सानप, पोह गर्जे यांनी केली आहे.