गेवराई दि 22 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील महार टाकळी परिसरात चकलांबा पोलिसांनी छापा टाकला सदर ठिकाणाहून दहा जूगारी तसेच दोन लाख रूपये जप्त करण्यात आली असल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि नारायण एकशिंगे यांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,महारटाकळी परिसरात एका शेतात लिंबाच्या झाडाखाली तिर्रट पत्याचा जूगार काही लोक खेळत असल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि नारायण एकशिंगे यांना गोपनिय बातमीदाराने दिली त्या अंनूषगाने त्यांनी आपल्या पथकासमवेत सदर ठिकाणी छापा मारला व याठिकाणावरून रमेश भाऊसाहेब केसभट ( वय 57 वर्ष ) राहणार गायवाड जळगाव,सलिम बादशाह पठाण, ( वय 60 वर्ष )अशोक दशरथ महानोर ( वय 51 वर्ष ) राम विलास सौंदलकर ( वय 40 वर्ष ) शब्बीर जाफर शेख ( वय 49 वर्ष ) राजेंद्र नामदेव कवळे ( वय 45 वर्ष ) भाऊसाहेब किसन महानोर ( वय 45 वर्ष ) कांता हरीभाऊ कवळे ( वय 55 वर्ष ) सर्व राहणार महारटाकळी व पंडित बाजिराव खोसे ( वय 50 )राहणार गायकवाड जळगाव ,सुभाष सुदाम पोटफोडे ( वय 50 वर्ष ) राहणार राक्षसभूवन हे विना परवाना तिर्रट नावाचा जूगार खेळत असतांना मिळून आले व त्यांच्या ताब्यातून दोन लाख रुपयासह चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्यांच्या विरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाई पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर,अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नारायण एकशिंगे,पो उपनि अंनता तांगडे पो उपनि कुमावत, पोह अमोल येळे,तूकाराम पौळ,चालक नागरगोजे यांनी केली असून पुढील तपास हवालदार मारूती केदार हे करत आहेत.