तलवाडा व गेवराईचे ठाणेदार पाठ थोपटून घेण्यात मग्न;चोविस तास लोटले तरी लूटलेला ऐवज मिळाला नाही
रोड रॉबरी प्रकरणातील आरोपीना तिन दिवसांची पोलिस कोठडी
गेवराई दि 20 ( वार्ताहार ) आठवडी बाजाराला जात असतांना गेवराईच्या एका सराफा व्यापाऱ्याला पांगरी जवळ सोने चांदीची बॅग तिन आरोपीनी पळवली तसेच या चोरांना तलवाडा परिसरात मनूबाई जवळा याठिकाणी पकडण्यात आले होते या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत तसेच चोविस तास लोटूनही अद्यापर्यंत चोरून नेलेला ऐवज सापडलेला नाही.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,पांगरी जवळ माळहिवरा फाट्यावर एका सराफा व्यापारी याला स्कॉर्पिओने धक्का मारून त्यांच्याकडील असनारी सोने व चांदीची बॅग हिसाकाऊन आरोपी पसार झाले होते तलवाडा हद्दीत मनुबाई जवळ्याजवळ या आरोपीना पोलिसांना पकडले परंतू तलवाडा आणि गेवराई पोलिसांत आरोपी पकडण्यावरून श्रेययुद्ध सुरू होते दोन्ही पोलिस ठाण्याचे प्रमूख आपआपल्या परीने आपली पाठ थोपठून घेण्यात मग्न होते परंतू तिन आरोपी एक सिल्हर रंगाची स्कॉर्पिओ सह आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले परंतू या गून्ह्यात चोरीला गेलेला लाखों ऐवज चोविस तास लोटूनही मिळून आला नाही ही शोकांतिका आहे श्रेयवादातच ठाणेदार मग्न आहेत आज या तिनही आरोपीना गेवराई न्यायालया समोर हजर केले होते त्यांना तिन दिवसांंची पोलिस कोठडी सुनावली असून पूढील तपास सपोनि कोठकर हे करत आहेत.