गेवराई दि 19 ( वार्ताहार ) चंकलाबा पोलिस ठाणे हद्दीतील तितरवणी तसेच सुरळेगांव याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री करत आहे तसेच वरील ठिकाणी चकलांबा पोलिसांनी छापा मारला व दोन आरोपी ताब्यात घेऊन 15 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील सुरळेगाव फाट्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये तसेच तिंतरवणी गावातील वडाच्या झाडाखाली दोन अनोळखी इसम देशी दारूची विक्री करत आहेत. बातमी मिळताच प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी तात्काळ टीम रवाना करून सदर ठिकाणी रेड केली असता बातमीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी दोन अनोळखी इसम मिळून आले त्यास त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1) राम तात्याबा निकाळजे रा पाथरवाला ता गेवराई जि बीड व 2 ) प्रशांत महादेव राख राग तिंतरवणी ता शिरूर का जि बीड असे सांगितले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 15700 रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल मिळून आला. त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर चकलांबा पोलिस ठाणे गुरनं 64/24, 67/24 दारूबंदी कायदा कलम 65( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरची कारवाई ही मा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, प्रशिक्षणार्थी पोलिस उप निरीक्षक गणेश कुमावत, पोलिस कॉ घोंगडे, पोलिस कॉ खटाणे यांनी केली असून पुढील तपास पोलिस हवालदार अमोल येळे करत आहेत.