कर्तुत्व शून्य असलेल्या विजयसिंह पंडिताची माझ्या विरोधात बोलायची लायकी नाही – बदामराव पंडित
गेवराई दि 19 ( वार्ताहार ) गेल्या 30 वर्षापासून मी 24 तास जनतेच्या कामासाठी सक्रिय आहे. सामान्य माणसाला उभा करण्यासोबतच, तालुक्यातील रस्ते पाणी शाळा इमारती यासह गेवराई शहरात प्रशासकीय सुसज्ज इमारती उभा करण्याचे काम मी केले आहे. त्यातून जनतेला सुविधा मिळाल्या हे जिल्ह्यातल्या लोकांना माहित आहे. परंतु निवडणुका आल्या की पाण्यातले डवणे बाहेर यावे तसे राजकीय कर्तुत्व शून्य असलेले विजयसिंह पंडित मेव्हण्याच्या मदतीसाठी बाहेर येतात आणि माझ्यावर आरोप करतात. वास्तविक पाहता माझ्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही असा घणाघाती आरोप करून गेवराई तालुक्यातील दुष्काळी स्थिती हाताळण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी गाव पातळीवर एकोप्याने सक्रिय राहून काम करावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.
गेवराई तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावाला प्यायला पाणी नाही तर भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी गेवराई शेतकरी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ज्येष्ठ विधीज्ञ ऍड एम एस इंदानी,माजी सभापती युधाजित पंडित,युवानेते रोहित पंडित, माजी सभापती पंढरीनाथ लगड, माजी सभापती तुकाराम हराळे, माजी जि प सदस्य शामराव राठोड, युवराज डोंगरे, पोपट भाऊ छाजेड, माजी सभापती भीष्माचार्य दाभाडे, महादेव औटी, सोपानराव जाधव, अनिरुद्ध लोंढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, युवा सेना तालुकाप्रमुख गोविंद दाभाडे, शहर प्रमुख शेख शेहेदाद, सिद्धेश्वरी कोकाटे, धर्मराज आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने विराट स्वरूप आलेल्या बैठकीत,बोलताना बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांनी सातत्याने गोरगरिबांच्या योजना अडवून त्यांच्यावर अन्याय करायचा, एव्हढेच काम या भावांनी केल्याचा आरोप करून, केवळ विधानसभेत मला पराभूत करण्यासाठी विरोधात असतानाही या दोन्ही पंडित भावांनी त्यांचे मेहुणे भाजप आमदार पवार यांना मदत केली, हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. निवडणुका आल्या की पाऊस पडल्यावर डवणे जसे वळवळ करत बाहेर येतात,तसे विजयसिंह पंडित बाहेर येऊन माझ्यावर आरोप करतात.माझ्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही असे ठणकावून सांगत, शिवाजीराव पंडित व अमरसिंह पंडित यांनी तरी तालुक्यात काही वर्ष काम केले, पण कर्तव्य शून्य असलेल्या विजयसिंह पंडितांचे गेवराईच्या जडणघडणीत काय योगदान आहे. बापाच्या जीवावर आयत्या पिठावर रेघोट्या मारणे आणि पैशाच्या जीवावर कार्यकर्ते फोडणे याशिवाय त्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करून, बदामराव पंडित म्हणाले की, तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.
आज अनेक गावांना प्यायला पाणी नाही. जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न उपस्थित होणार आहे.अशा स्थितीत शासनाकडे आपण टँकर प्रस्ताव पाठवून दावणीत जनावरांना चारा देण्याची मागणी केली आहे.शासन यावर लवकरच निर्णय घेईल.पण कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी आपापल्या गावांमध्ये शेतकरी,कष्टकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या जागेवर सोडविण्याचा प्रयत्न करावा. काही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क करून या गरिबांची कामे तात्काळ करून घ्यावीत.दुष्काळात कोणावरही संकट ओढवले जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही बदामराव पंडित म्हणाले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना युवानेते रोहित पंडित, पंढरीनाथ लगड, अनिरुद्ध लोंढे यांनी उपस्थित शेतकरी व शिवसैनिकांशी संवाद साधताना बदामराव पंडित हे रात्रंदिवस 24 तास जनतेच्या सेवेत असतात.प्रत्येकाचे दुःख आणि प्रश्न कमी करण्यासाठी ते नेहमीच झगडतात.मात्र अवकात नसलेली काही मंडळी त्यांच्यावर आरोप करताना आता आपण शांत बसू नये असे आवाहन केले.गेवराई शहरातील तहसील कार्यालय नवीन बस स्थानक, पंचायत समिती इमारत, पाणी फिल्टर प्लांट, पाणीपुरवठा योजना, सुसज्ज कोर्टाची इमारत उभारण्याचे काम बदामराव आबांनी केले असल्याचे सांगितले.आता दुष्काळी स्थिती असताना ग्रामस्थांच्या मदतीसाठी आणि दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी सगळ्यात अगोदर बदामराव पंडित हेच मदतीला धावून आले आहेत.यापुढेही बदामराव पंडित यांना ताकद देण्यासाठी आपण आपापल्या गावात कायम संपर्कात राहून संघटन मजबूत करून जनहिताचे काम करावे असे आवाहन केले.
या विराट बैठकीला माजी उपनगराध्यक्ष अमोल करांडे, सरपंच जगदीश मस्के, मुकुंद बाबर, भैयासाहेब नाईकवाडे, अमरसिंह मस्के, शेख फत्ते मामू, धनेश्वर खेत्रे, पापा चव्हाण, बंडू पवार, गोविंद डरपे, संभाजी नाटकर, संभाजीराव आहेर, कैलास शिंदे, प्रशांत मोरे, विलास शिंदे, किरण आहेर, बंडू आप्पा घोलप, सुभाषराव शिंदे, महादेव खेत्रे, बदाम पौळ, भागवत आरबड, आनंदे महाराज, हरिभाऊ गलधर, कैलास राठोड, आयुबभाई पठाण, बाबुराव जाधव, कॅप्टन गिरी, अशोक साखरे, आबा उबाळे, पप्पू कोठेकर, राम काळे, भारत मडके, चंद्रसेन जाधव, दीपक रडे, शेख सुलेमान, काशिनाथ आडगळे, अशोक तौर, राजू नाडे, शेख नवीद, गेवराई मतदार संघातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य आणि शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...