एक हायवासह ट्रॅक्टर ताब्यात;चकलांबा ठाण्यात गून्हा दाखल
13 लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि 18 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील बोरगाव या शिवारातून अनाधीकृत विना रॉयल्टी हायवा वाळूने भरून चालला होता त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याकडे रॉयल्टी नव्हती चालकाने पलायन केले त्यानंतर सदरचा हायवा चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेऊन गून्हा दाखल केला आहे तसेच एक ट्रॅक्टरही पोलिसांनी पकडला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील बोरगांव जूने याठिकाणी अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली तसेच सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला यामध्ये हायवा क्रं एम 16 – 9998 व ट्रॅक्टर क्रं एम एच 16 सीव्ही 5329 हे दोन्ही वाहने मिळून आली तसेच हायवा व ट्रॅक्टर चालक हे दोन्ही पसार झाले आहेत चार ब्रास वाळूसह 13 लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विठ्ठल खटाणे,मधूकर सुरवसे यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अशोक तिपाले व अमोल येळे हे करत आहेत सदरची कार्यवाई ही उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू,सपोनि नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनि तांगडे विठ्ठल खटाणे,अमोल येळे मधूकर सुरवसे,तूकाराम पौळ,यांनी केली आहे.