सपोनि नारायण एकशिंगे यांनी दरोड्याच्या गून्ह्यातील 1 लाख 67 हजाराचा मुद्देमाल फिर्यादीस केला परत
गेवराई दि 13 ( वार्ताहार ) गेल्या काही महिण्यापुर्वी चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या दरोड्याच्या गून्ह्यात लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता तसेच तपास पुर्ण करूण चकलांबा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या तसेच या गून्ह्यातील आरोपी कडून मिळालेला मुद्देमाल फिर्यादीला परत करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, कोळगाव परिसरात दरोडा टाकून लाखोंचा ऐवज दरोडे खोरांनी लुटला होता तसेच अनेक दिवस सदर प्रकरणातील आरोपी फरार होते तसेच या गून्ह्यात चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि नारायण एकशिंगे यांनी मोठ्या शिताफिने या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या तसेच दरोड्यात लूटलेला ऐवज आरोपी कडून हस्तगत केला आहे तसेच 1 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल सपोनि एकशिंगे यांनी परत केला आहे.