April 19, 2025

पत्रकार उत्तम हजारे यांचा रयत पुरस्काराने सन्मान

सिनेमा कलावंत, रिल्स स्टार यांच्या उपस्थितीत साजरा झाला रयत प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा

 

बीड दि 12 ( वार्ताहार ) बीडच्या रयत सामाजिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा बीडच्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनमध्ये मोठया थाटात साजरा झाला. यंदाच्या पुरस्कार सोहळयात सिनेमा क्षेत्रातील कलावंत ,रिल स्टार, इंन्सटाग्राम स्टार यांची रेलचेल या पुरस्कार सोहळयात बघायला मिळाली. मनोरंजन क्षेत्रातील कलावंता बरोबरच वकिल , डाँक्टर, पत्रकार, नगरसेवक ,समाजसेवक, उद्योजक, संपादक, अश्या विवीध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. दैनिक लोकाशाचे निवासी संपादक उत्तम हजारे यांना रयत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कार सोहयासाठी सिनेमा क्षेत्रातील महेंद्र खिल्लारै , महादेव ( म्यडी) सवाई ,ज्योती जावळे, प्रविण वडमारे, एजाज शेख, संतोष वारे ,विलास सोनवणे,सुरेखा डोंगरदिवे, रणजित वाघमारे, प्रमोद रामदासी , दैनिक लोकांकितचे संपादक संजय पवार सर, जेष्ठ पत्रकार उत्तम हजारे ,नगरसेवक विकास जोगदंड साहेब असे कलाकार व मान्यवर उपस्थित होते तर शोशल मिडीयावर अल्पावधीतच रिल्स , इंन्सटाग्राम म्हणुन प्रसिद्धी झोतात आलेले अनेक कलावंत या सोहयात न्हाऊन निघाले आहेत, रयतच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळयात अनेक दिग्गज मान्यवर पुरस्कार प्रदान करण्यासाठी उपस्थित होते . यामध्ये राजेश खर्डै ( नाखवा ) मुंबई , विठ्ठल मुर्केवार ( सेवा निव्रुत्त वरिष्ठ अधिकारी,रयतच्या संस्थापक अध्यक्ष रोहीणी ताई गणेश माने,कैलास दादा पठारै (जेष्ठ समाजसेवक ) , लक्ष्मण लटपटे ओ.बी.सी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, अँड अविनाश गंडले आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला .यावेळी रयत सामाजिक प्रतिष्ठानचे गणेश माने , जिल्हा अध्यक्ष संतोष कुराडे, गणेश तालखेडकर, प्रमोद रामदासी, रणजित वाघमारे, तुषार जाधव , मिनाक्षी देवकते व इतरांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *