महिलेला मारहान केल्या प्रकरणी एकावर तलवाडा पोलिसांत गून्हा
सोशल मिडीयावर क्लीप व्हॉयरल झाल्याने प्रकारउघडकीस
गेवराई दि 11 ( वार्ताहार ) तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील चोपड्याची वाडी याठिकाणी गावातील एका ईसमाने महिलेला मारहान करत लज्जास्पद वागणूक देऊन मारहान केल्या प्रकरणी एकावर तलवाडा पोलिसांत एॅट्रॉसिटी नूसार गून्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,विठ्ठल आसाराम चोपडे ( वय 35 वर्ष ) राहणार चोपड्याची वाडी तालूका गेवराई जिल्हा बीड याने मातंग समाजातील महिलेला अमानूषपणे मारहान केली तसेच लज्जास्पद बोलून तिला अपमानित केले असल्याची घटना आज ( दि 11 मार्च ) रोजी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे तसेच या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हॉयरल झाल्याने गेवराईचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांनी तात्काळ गून्हा दाखल करण्याचे आदेश दिले तसेच आरोपी विरूद्ध तलवाडा पोलिसांत एॅट्राॅसिटी व अन्य कलमान्वे गून्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु हे करत आहेत.तसेच आरोपी अद्याप फरार आहे.