April 19, 2025

भैय्यासाहेब तूमच्या स्वच्छ प्रतिमेच्या राजकारणाला डाग लाऊ नका

गूटखा माफिया दादा जाधव च्या प्रवेशाने नाराजीचा सुर

गेवराई दि 11 ( वार्ताहार ) तालुक्यात राजकीय वातावरण तापत आहे अनेक कार्यकर्ते माजी आ अमरसिंह पंडित यांच्या नेतृवावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत परंतू जे कार्यकर्ते आपल्याकडे प्रवेश करतात त्यांची पात्रता काय?हे पण बघणे एका नेत्याचे कर्तव्य असते स्वच्छ व पारदर्शक नेता म्हणून गेवराई तालुक्यात माजी आ अमरसिंह पंडित यांची छबी आहे पाढंरवाडीत पक्ष प्रवेश झाला अंसख्य कार्यकर्तेही जूडले परंतू एका गूटखा माफियाला प्रवेश दिला कसा?ही गोष्ट पचनी पडली नाही.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील पांढरवाडी हे गाव शहराच्या लगत आहे तसेच या गावांत नेहमीच राजकीय घडामोडी घडत असतात परंतू ज्या व्यक्तीचं कूठलेही राजकीय स्थान नाही तसेच गावांत यांच्या विरूद्ध संतापाची लाट आहे अश्या एका गेवराई शिवाजी चौकाती ओम ज्ञानेश ट्रेसर्ड च्या नावाखाली गूटख्याची तस्करी करतो तसेच यांच्यावर अश्या स्वरूपाचे गून्हे दाखल आहेत जो नुकताच संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहातून जामिनवर सुटून बाहेर आला आहे दादा जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाला यांची संपुर्ण चर्चा गेवराई तालुक्यात झाली जो आपले स्वत;चे पाप झाकण्यासाठी व यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी माजी आ अमरसिंह पंडित गटात दाखल झालेला आहे.

ही बाब अंत्यत्य खेदजनक आहे यावर काही तालूक्यातील राजकारणी मंडळीनी भाष्य केले माजी आ अमरसिंह पंडित यांच्याकडे काम करनाऱ्या अनेक दिग्गज कार्यकर्ते यांची फौज आहे तसेच त्याचं राजकारण स्वच्छ व पारदर्शक आहे अश्या लोकांच्या प्रवेशाने पक्षाला व नेत्याच्या कारकिर्दीवर डाग लागू शकतो अश्या लोकांना माजी आ अमरसिंह पंडित यांनी प्रवेश नाकरावा व ज्याला पक्षात घ्यायचे आहे त्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे जेणेकरून प्रामाणिक कार्यकर्ते दूर होतील यांची दक्षता घ्यायला हवी व कूठल्याही गून्हेगारी व अवैध धंद्यावाल्याशी निगडीत असनाऱ्या अश्या संधीसाधू लोकांपासून वेळीच सावधं व्हायला हवे व अश्या गूटखा माफिया दादा जाधव सारख्या लोकांचा प्रवेश नाकारावा अशी अपेक्षा माजी आ अमरसिंह पंडित यांच्याकडून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *