April 19, 2025

जे.डी. शहा सारख्या लबाड दलालाने भोकण्याचे काम बंद करावेआनंद सरपते 

उपेक्षित, वंचित निराधारांकडुन लाच घेणार्‍यांनी स्वता:चे
आत्मपरिक्षण करावे

गेवराई  दि. 10 ( वार्ताहार )  तालुक्यातील विधवा, दिव्यांग या सारख्या गोरगरीब निराधारांची अडवणुक करत त्यांच्याकडुन पैसे घेणार्‍यांनी स्वता:चे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या संदर्भात बोलण्याची त्यांची लायकी नाही, केवळ दलालीच्या तुकड्यावर पोसलेल्या जे.डी. शहा सारख्या लबाड दलालाने भोकण्याचे काम बंद करावे नसता निराधार तुम्हाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद सरपते यांनी दिला. आ. लक्ष्मण पवार आणि त्यांच्या लाचखोर बगलबच्यांना आमचे आंदोलन जिव्हारी लागल्यामुळे नैराश्येतुन त्यांची अशी आगपाखड होत असल्याने प्रसिद्दी पत्रक काढुन निराधारांची दिशाभुल करण्याचे पाप हे लोक करत असल्याचा आरोपही आनंद सरपते यांनी केला.

स्वता:ला कार्यसम्राट म्हणुन घेणार्‍या आ. लक्ष्मण पवार यांनी गेवराई तालुका संजय गांधी निराधार समितीमधे आपल्या लाचखोर बगलबच्यांना स्थान देवुन त्यांना निराधारांच्या माध्यमातुन दुकानदारी सुरु करुन दिली आहे. गावोगावी नेमलेल्या दलालांमार्फत तालुक्यातील वंचित, उपेक्षित, गोरगरीब, विधवा आणि दिव्यांगाकडुन मोठ्या प्रमाणावर वसुली करुन ज्यांनी पैसे दिले त्यांचेच अर्ज मंजुर करायचे पाप केले आहे.आजही तालुक्यात या लाचखोरांच्या पापामुळे खरे निराधार रास्त लाभापासुन वंचित आहेत. जे.डी. शहा सारख्या स्वता:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणुन घेणार्‍या लबाडाने या योजनेत मोठा मलीदा लाटण्याचे पाप केले आहे. पैसे दिलेले लोक यांना आता रस्त्याने फिरु देत नाहीत, दगडं घेवुन हे लोक त्यांच्या मागे लागत असल्यामुळे आता निराधारांची दिशाभुल करण्यासाठी आमच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप करण्याचे काम जे.डी. शहा सारखे लोक करत आहेत. त्यांनी केलेले पाप निराधार विसारणार नाहीत त्यामुळे या लबाड दलालांनी भोकण्याचे काम बंद करावे असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद सरपते यांनी दिला.

निराधारांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय सेलच्या माध्यमातुन आंदोलन केले, मंजुर असलेल्यांचे अर्ज नामंजुर करा अशी आमची मागणी नव्हती, समितीने लाचखोरी करुन ज्या खर्‍या निराधारांचे अर्ज गहाळ केले त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबिला. या आंदोलनातुन आ. लक्ष्मण पवार आणि जे.डी. शहा सारख्या त्यांच्या बगलबच्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आल्यामुळे वैफल्यातुन ते आता खोटे-नाटे आरोप करत असल्याचे आनंद सरपते यांनी सांगितले. स्वता:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणुन घेणार्‍यांनी निराधारांचे घेतलेले पैसे तात्काळ परत करावेत नसता हे लोक त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. जे.डी. शहा याने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाचा आनंद सरपते यांनी खरपुच समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *