April 19, 2025

राज्यात पँथरची डरकाळी फोडणारधम्मपाल कांडेकर

 

गेवराई दि 9 ( वार्ताहार ) राज्यात पुन्हा नव्या जोमाने पँथर डरकाळी फोडणार तसेच राज्यातील कानाकोपऱ्यात पॅंथर रिप्लीकन पक्षाचे नाव व युवकांची मोठी फळी निर्माण करणार असल्याचे मत नवनिर्वाचित राज्याचे युवा अध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी मांडले आहे.

पँथरर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतिने गेवराईत मेळावा व सत्कार संभारंभ च्या कार्यक्रमाला सबोधित करताना ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्र पँथरर्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सिद्धांतजी गाडे,आनंदजी गायकवाड,सर्जेराव मनोरे,विलास कटारे,बाबूराव नरवडे,संदिप खरात,साहेबराव नवतूरे,सुनिल महाकाळे,विजय दिवेकर,प्रविण गाडेकर,किशोर जाधव,विधिज्ञ वंदना पारवे,शेख बाबा, सुरेश कारके यांची उपस्थिती होती पुढे बोलताना ते म्हणाले की पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी मी चोखपणे बजावणार तसेच माझ्यासारख्या चळवळीतल्या छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने महाराष्ट्र राज्याची जबाबदारी दिली त्या संधीचे मी सोने करेल तसेच यापुढे महाराष्ट्रात पँथरची डरकाळी फोडणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *