उपविभागिय पोलिस अधिकारी शिवाजी चौकातील ओम ज्ञानेश ट्रेडर्सवर कार्यवाई करणार का?
गेवराई दि 4 ( वार्ताहार ) शहरातील शिवाजी चौकात असनाऱ्या ओम ज्ञानेश ट्रेडर्सच्या नावाखाली खूलेआम दिवसाढवळ्या गूटख्याची तस्करी सुरू आहे याला लगाम घालण्याची हिंम्मत गेवराईचे पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगूरु दाखवणार का?व शहरात सुरू असलेला हा गूटख्याचा गोरखधंदा बंद करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड व गेवराई शहरात शिवाजी चौकातील ओम ज्ञानेश ट्रेडर मध्ये खूले आम दादा जाधव नावाचा ईसम या दूकानाचा व अवैध सामराज्य याचा मालक आहे अशी माहिती आहे तसेच काही दिवसापुर्वी संभाजी नगरच्या क्राईमब्राच च्या टिमणे दादा जाधव यांच्या मुसक्या आवळल्या होत्या तसेच तो संभाजी नगरच्या हर्सूल कारागृहात आठ दिवस कोठडीत होता जामिनवर सुटका होताच तो पुन्हा गेवराईत सक्रीय झाला तसेच तो दोन दिवसाला पंदरा ते विस लाखांचा गूटखा आपल्या दूकानातून विक्री करतो तसेच हा कोणत्याही अधिकारी यांना जूमानत नाही गेवराई तालुक्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज यांनी या प्रकरणी लक्ष घालून यांच्यावर कार्यवाई करावी अशी अपेक्षा त्याच्यांकडून आहे .