April 19, 2025

दोन हायवा सह दिडशे ब्रास वाळू साठा जप्त

उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांची कार्यवाई

 

गेवराई दि 23 ( वार्ताहार ) वाळू माफियांनी गेवराई परिसरात धूमाकूळ घातला होता तसेच आज ( दि 23 रोजी ) चारच्या दरम्यान गेवराईचे उपविभागिय अधिकारी नीरज राजगूरू यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी राक्षसभूवन परिसरातील मिरी परिसरातून दोन ओव्हरलोड हायवा तसेच गेवराई शहरातील गोदावरी मंगल कार्लयाच्या पाठीमागे दिडशे ब्रास वाळूसाठा जप्त केला असल्याची माहिती उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी दिली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,राक्षसभूवन परिरात स्टॉक टेंडरच्या नावाखाली ईतर ठिकाणाहून अवैध वाळू वाहतूक होत आहे तसेच रॉयल्टी पावती असतांना ओव्हरलोड वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती गूप्त बातमी दाराने उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांना दिली त्यांनी राक्षसभूवन परिसरातील मिरी परिसरातून दोन हायवा ताब्यात घेतल्या आहेत तसेच यांच्याकडे रॉयल्टी असल्याची माहिती असुन ही कार्यवाई ओव्हर लोड मुळे करण्यात आली तसेच बीड जालना रोडवरील गोदावरी मंगल कार्यलयाच्या पाठीमागे दिडशे ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला आहेत या दोन्ही कार्यवाईच्या मिळून अंदाजे चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच उपविभागीय नीरज राजगूरु यांनी गोदापात्रात परिसरात अनेक वाळू माफिया तसेच लोकेशन देनारे यांना चोपही दिला आहे सदरच्या सिंगम कार्यवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *