April 19, 2025

घरावर छत्रपतींचा पुतळा;मयत भावाची संकल्पना पुर्ण 

सुरेश बरगे याचं ऐतिहासिक पाऊल 

गेवराई दि 19 ( वार्ताहार ) आज शिवजंयती निमित्त गेवराई शहरामध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती साजरी करण्यात आली परंतू याच जंयतीचे औचित्य साधून गेवराई व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश बरगे यांनी आपल्या कोल्हेर रोड याठिकाणी बांधण्यात आलेल्या वास्तूच्या टेरेसवर अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला आहे.

कोल्हेर रोडवर शिवाई नगरी परिसरात सुरेश बरगे यांच्या दोन हजार चौरस मिटर मध्ये नविन वास्तूचे काम पुर्ण झाले आहे तसेच त्यांचे धाकटे बंधू कै संजय बरगे याचं अपघाती निधन झाले ते हयात असतांना त्यांनी बंधू सुरेश बरगे यांच्यासमोर त्यांनी आपल्या घराच्या टेरेसवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारू अशी संकल्पना त्यांची होती परंतू काळाने घाला घातला आणि त्याचं अपघाती निधन झाले त्यांची संकल्पना ही बंधू सुरेश बरगे यांनी पुर्ण केली तसेच आज शिव छत्रपतीची जंयती निमित्त त्यांनी गेवराई शहरात या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याची मिरवणूक ढोलताश्या च्या गजरात काढून शिवाई नगरी याठिकाणी त्यांच्या नविन वास्तूच्या टेरेसवर अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला तसेच त्यांनी हा अश्वरूढ पुतळा पुणे या ठिकाणाहून आनला असुन हा अश्वरूढ दहा फूट रूदं आणि पंदराफूच उचं आहे संपुर्ण परिसरात यांची शोभा उमटून दिसत होती तसेच आपण ही संकल्पना धाकटे बंधू कै संजय बरगे यांची होती ती पुर्ण केली असून लवकरच जानताराजा प्रतिष्ठाण च्या वतिने गेवराई शहरातील शिवाजी चौक याठिकाणी असाच शिव छत्रपतीं चा पुतळा उभारण्यासाठी राजकीय,सामाजिक,आणि प्रशासनातील अधिकारी यांनी मदत करूण गेवराई करांची ईछ्चा पुर्ण करावी अशी अपेक्षा सुरेश बरगे यांनी बोलतांना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *