गेवराई दि 18 ( वार्ताहार ) गेल्या अनेक दिवसांपासुन एका दरोड्याच्या गून्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचारी यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केल्या प्रकरणी दहा लोकांविरूद्ध गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई न्यायलयाने एका दरोड्याच्या गून्ह्यात वारंट काढले होते तो आरोपी कोल्हेर पाटाच्या दिशेने आपल्या काही साथीदारासोबत रेवकीला जात असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली होती तसेच गेवराई पोलिस ठाण्यातील कर्मचारी वर्दीवर कोल्हेर शिवारात रवाना झाले असता पोलिसांना पाहून त्यांच्या दिशेने लाल मिरची पावडर पुड आरोपीने भिरकावली व पोलिसांच्या डोळ्यात मिरची टाकून ते फरार झाली असल्याची माहिती समोर आली आहे तसेच गेवराई पोलिस ठाण्यात अशोक हंबार्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरूण सफऱ्या आसाराम चव्हाण ,रुक्साना सफऱ्या चव्हाण,पारस आसाराम चव्हाण,पारेनास आसाराम चव्हाण,आसाराम आबू चव्हाण,करीना आसाराम चव्हाण,गूढी पारस चव्हाण यांच्यासह तिन ईतर आरोपी विरूद्ध शासकीय कामात अडथळा,व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गून्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शिवाजी भूतेकर हे करत आहेत