गेवराई दि 10 ( वार्ताहार ) तालुक्यातील सावरगाव याठिकाणी एका दिवसांत पोलिस आणि महसुल यांना गूंगारा देऊन हजारो ब्रास वाळू उपसा केला असल्याची माहिती तसेच एका वसुलीदक्ष हंबार्डे? नामक पोलिसांने याठिकाणी वाळू उपसा करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती आहे.तसेच सावरगाव परिसरातून सकाळपासुनच मोठ्या प्रगती पथावर वाळू उपसा सुरू आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या काही दिवसांपासुन सावरगाव ,राक्षसभूवन ,परिसरातील वाळू उपसा बंद होता परंतू तहसिलदार यांच्या नाकर्तेपनामुळे हा सगळा गोंधळ सुरू आहे तसेच गेल्या काही दिवसांपुर्वीच गेवराईच्या ठाणेदार म्हणून प्रविणकूमार बांगर यांना नियुक्ती मिळाली आहे आल्यापासुन आत्तापर्यंत त्यांनी कुठलीही ठोस कार्यवाई केली नाही हारतूऱ्यातच ते व्यस्थ आहेत त्यांच्याच पोलिस ठाण्यातील हंबार्डे?नामक पोलिस कर्मचारी यांने सावरगाव याठिकाणी वाळू उपसा करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती आहे तसेच याठिकाणी एकाच दिवसांत हजारोब्रास वाळू उपसा केला आहे तो कुनाच्या घश्यात घालायचा आहे गोदापात्रात वाळूची परवानगी देनाऱ्या हंबार्डे नामक पोलिस कर्मचारी याला पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांनी समज द्यावी नसता त्यांचेही हात या वाळूत ओले आहेत का?असा सवाल यानिमित्ताने उपस्तिथ केला जाऊ लागला आहे तसेच याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.