स्थानिक गून्हे शाखेने मोऱ्हक्याच्या आवळल्या मुसक्या
बीड दि 9 ( वार्ताहार ) मा.पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्ह्यातील घरफोडीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणून प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याच्या मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांनी उघड नसलेल्या सर्व घरफोडी गुन्हयाचे विश्लेशण करून घरफोडी पथकास गेवराई आष्टी ,अंमळनेर,नेकनुर,चकलंबा, हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार यांची माहिती घेण्यासाठी पोउपनि श्रीराम खटावकर यांचे पथकास योग्य मार्गदर्शन केले.पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांचे आदेशान्वये दिनांक 08/02/2024 रोजी पोउपनि श्रीराम खटावकर व स्था.गु.शा.पथक अंमलदार हे पो.ठा.गेवराई 56/2024 कलम, 353,332,143,147,148,149 भादंवि गुन्हयातील फरार आरोपी नामे सचिन ईश्वर भोसले याचा शोध घेत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, सचिन ईश्वर भोसले हा सध्या उमापुर फाटा येथे असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. नमुद आरोपी सराईत आरोपी असल्याने स्थागुशा पथकाने सदर ठिकाणी नियोजनबध्द सापळा लावला असता त्यास पोलीस असल्याचा संशय आल्याने तो मोटार सायकलवर पळून जाण्याचे बेतात असतांना स्थागुशा पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यास गेवराई,आष्टी, अंभोरा, अंमळनेर, नेकनूर, चकलंबा या भागात केलेल्या घरफोडी अनुषंगाने बारकाईने विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर दोन साथीदारासह या भागात घराचे कुलूप व कडी कोयडा तोडुन घरफोडया केल्या असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीचे चौकशीवरुन खालील नमुद गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदर गुन्हयांतील आरोपी हे दिवसा व रात्री बंद घराची रेखी करायाचे नंतर लोखंडी रॉड, कटावणीच्या सहाय्याने बंद असलेल्या घराचे कुलूप व कोंडा तोडुन आत प्रवेश करून घरात ठेवलेले दागिने, रोख रक्कम चोरी करण्याचे सवईचे आहेत.
आरोपी नामे सचिन ईश्वर भोसले याचा पुर्व अभिलेख पाहता त्याने यापुर्वी कर्जत, पाथर्डी, गेवराई, आष्टी, सांगोला, मालेगाव छावणी भागात दरोडा, दरोडयाची दयारी, घरफोडी, चोरीचे गुन्हे केलेले असून अभिलेखावर एकुण (08) गुन्हे दाखल आहेत.त्याचे इतर फरार साथीदारांवर वरील प्रमाणेच (37) गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीकडुन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्हयांतील गेलामाल हस्तगत करण्याचे काम पोलीस स्टेशन व स्थागुशा पथका मार्फत संयुक्तरित्या चालु असून आरोपीस पो.ठा.चकलंबा पोलीसाच्या ताब्यात देण्यात आलेले असून पुढील तपास चंकलबा पोलीस व स्थागुशा पथक करीत आहेत. उर्वरित फरार आरोपीचा शोधा स्थागुशा बीड घेत आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक बीड,मा.श्री.सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड,मा.श्रीमती चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक,अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा येथील पोनि श्री. पो.नि. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि सचिन आंधळे, नारायण कोरडे, अश्विनकुमार सुरवसे, महिला पोह सुशिला हजारे, चालक अशोक कदम, व राठोड सर्व, यांनी केलेली आहे.