किंगसन ग्लोबल स्कूलमध्ये दर्जेदार शिक्षणासह
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी ही कौतुकास्पद बाब – दिनकर शिंदे

वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

गेवराई दि 9( वार्ताहार ) आजच्या स्पर्धेच्या युगात बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासाचा मोठा भार वाढत आह मात्र किंगसन ग्लोबल स्कूलमध्ये ज्ञानदानासोबतच त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा यासारख्या विविध कालागुणनात्मक कार्यक्रमांचे अयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम होत आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन पत्रकार दिनकर शिंदे यांनी केले.

गेवराई येथील किंगसन ग्लोबल स्कूलच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख सुनील कुर्लेकर,तालुका क्रीडा समन्वयक बापूसाहेब तारुकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन मोटे, प्रा.राजेंद्र बरकसे, डॉ.दामोधर कुटे, पत्रकार तथा सरपंच भागवत जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराईचे संचालक राम जिजा चाळक, सरपंच रामप्रसाद चाळक, महारुद्र चाळक, लक्ष्मण यादव, हरिभाऊ चाळक, माजी सरपंच रामनाथराव चाळक, तात्यासाहेब चाळक , गणेश तांबे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना दिनकर शिंदे यांनी सांगितले की,संचालक शाम चाळक व सौ वेदिकाताई चाळक यांच्या अथक परिश्रमामुळे किंगसन ग्लोबल स्कूल आज पालकांच्या उत्तम पसंतीला उतरली आहे. ज्युनिअर केजी ते 8 वी पर्यंत सीबीएससी अभ्यासक्रमाची असलेली ही शाळा,गेवराई शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सरस्वती कॉलनी येथे गेल्या आठ वर्षापासून छोट्याशा जागेमध्ये सुरू होती परंतु आता ही शाळा कोल्हेर रोड येथील निसर्गरम्य असलेल्या दत्त नगरीमध्ये स्वतःच्या मालकीच्या जागेत लवकरच स्थलांतरित होत असून यापुढेही शाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

या स्नेहसंमेलनामध्ये शाळेतील चिमुकल्या कलावंतांनी आपला नृत्याविष्कारासह युगत मांडली, संत गोरा कुंभार, आज है संडे, मै निकला गड्डी लेके, गाव सुटाणा, मराठी रिमिक्स, ढगांन आभाळ अशी अनेक कलाविष्कार सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.या बालकलावंतांचे कौतुक करण्यासाठी सर्व महिला,पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा पाटील मिस, सीमा कुलकर्णी,भाग्यश्री पाठक, निकिता कोकणे, जयश्री भोसले, ज्योती आतकरे, स्वाती मिसाळ, मदतीस शारदा पवार, मनीषा सुतार व तात्यासाहेब पठाडे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक शाम चाळक,सूत्रसंचालन ऋतुजा राठोड व भक्ती सोळुंके यांनी केले तर मुख्याध्यापिका वेदिका चाळक यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *