April 19, 2025

नागरिकांनी घाबरू नये – तहसिलदार सुहास हजारे 

 

बीड: दि 6 ( वार्ताहार ) सोमवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील बीड, गढी, गेवराई भागात झालेल्या गुढ आवाजाने खळबळ माजली आहे.अशातच सदरच्या आवाजाचा भूकंपाशी संबंध नसून पाणी पातळी खालावल्यामुळे कधी कधी भूगर्भातून असे आवाज येतात, मात्र जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


बीड शहरातील अनेक भागात मंगळवारी (दि.6) रात्री 8 वाजून 20मिनिटांनी गूढ आवाज झाला. अचानक आलेल्या आवाजामुळे नागरिक व लहान बालके भयभीत झाली.जिल्ह्यात यापूर्वी अनेकवेळा गूढ आवाज झाले आहेत. दरम्यान बीड शहरात मंगळवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी मोठा आवाज झाला. त्यामुळे खिडक्या, घराचे दरवाजे हादरली व भांडी पडली.अनेकांना भूकंप असल्याचे जाणवले.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान सदरचा प्रकार भूकंप नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूरच्या भूकंप निरीक्षण केंद्रात कोणत्याही भूकंपाची नोंद झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.पाणी पातळी खालावल्याने जमिनीत निर्वात पोकळी निर्माण होते आणि त्यामुळे असे काही आवाज येऊ शकतात.तरी जनतेने घाबरुन जाऊ नये असे आवाहन बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *