April 19, 2025

अखेर स्वप्नपूर्ती झाली,लढा यशस्वी-तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायतीचा जी.आर निघाला

 प्रा.पी.टी.चव्हाण यांनी मानले ना.देवेंद्र फडणविस व ना. गिरीश महाजन यांचे आभार

बीड  दि 5 ( वार्ताहार ) – राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या कोटींच्या आसपास असून बंजारा तांड्यांची संख्या आठ हजारांहून अधिक आहे.विदर्भातील काही तांड्यांचा अपवाद वगळता मराठवाडा,खान्देश,पश्चिम महाराष्ट्र या विभागातील तांडे मोठ्या गावांना जोडून ग्रुप ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या होत्या.तांड्याला पर्याप्त विकास निधी उपलब्ध होत नव्हता तसेच स्वतंत्र ग्रामपंचायती साठी एक हजार लोकसंख्येची अट असल्याने विभक्तीकरण साठी कायद्याची अडचणी येत होती,परिणामी तांडे विकासापासून कोसो दूर राहिले.

500 लोकसभा असलेल्या तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करण्यात याव्यात अशी मागणी 30 वर्षांपासून सरकारकडे केली जात होती, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने सकारात्मक विचार करून स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी मान्य केली असून जी.आर सुद्धा काढला आहे. या निर्णयामुळे बंजारा समाजाच्या परिवर्तनवादी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे.या धाडसी निर्णयाबद्दल राष्ट्रीय बंजारा राजकीय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष,भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फंड व ग्रामविकासमंत्री ना. गिरीशजी महाजन यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.बंजारा तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायती नसल्याने गावातील धनदांडगे व जातदांडगे पुढारी सरकारकडून आलेला विकासनिधी कागदावर खर्च दाखवून लाखो रुपयांचा बिनबोभाट भ्रष्टाचार करायचे, बोलायची व जाब विचारायची हिम्मत नव्हती.म्हणून तांडे गावापासून स्वतंत्र करा,तांड्याचा कारभार तेथील मंडळी पाहतील अशी आग्रही मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेने विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे सातत्याने मांडली आहे.

गोद्री कुंभमेळ्याच्या कार्यक्रमात दिलेलं आश्वासन ना.गिरीश भाऊ महाजन यांनी पाळल ग्रामविकासमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांनी बंजारा तांड्याची दुरावस्था पाहिली आहे,म्हणून तांडे गावापासून वेगळे केल्या शिवाय विकास होणार नाही या करीता ना.गिरीश भाऊंनी मागणीची दखल तर घेतलीच परंतु आज स्वतः पुढाकार घेऊन निर्णय जाहीर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व बंजारा समाजाला न्याय मिळवून दिला आहे.मागील वर्षी जामनेर येथे रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने गोद्री येथे कुंभमेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी समाजाने केलेल्या घोषणेची पूर्तता करून ना. गिरीश महाजन यांनी दिलेले आश्वासन पाळले आहे,बद्दल बंजारा समाजाच्या वतीने ना.गिरीश महाजन साहेबांना धन्यवाद दिले जात आहे.

अलीकडच्या काळात सरकार मधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सह अनेक मंत्र्यांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी राज्यस्तरीय बैठक घेऊन तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करावी,हि मागणी लावून धरली होती. शेवटी बंजारा समाजाच्या प्रलंबित व जिव्हाळ्याच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन महायुती सरकारने सोमवार दि.5 जानेवारी रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून लगेच जी.आर काढला आहे.या निर्णयामुळे राज्यातील आठ हजार पेक्षा जास्त तांड्याना विकासाचा मार्ग मोकळा झाला असून खर्या अर्थाने तांड्यावर स्वातंत्र्याची पहाट उजाडणार आहे.महायुती सरकारने बंजारा समाजाची जिव्हाळ्याची तसेच तांड्याला प्रगतीपथावर नेणारी मागणी मान्य करुन सामाजिक न्याय दिल्याबद्दल लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, धाडसी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,कार्यक्षम ग्रामविकासमंत्री गिरीशजी महाजन,मृद व जलसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे,भाजपचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावणकुळे साहेब तसेच मागील अनेक महिन्यांपासून संबंधित मंत्री व विभाग प्रमुखाकडे स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी तगादा लावून निर्णय होईपर्यंत अविरत प्रयत्न करणारे गोद्री कुंभमेळाचे संयोजक,बंजारा समाजाचे युवा नेते रामेश्वरभाऊ नाईक, ग्रामविकासमंत्री ना.गिरीश महाजन यांचे स्विय सहाय्यक निलेश जाधव यांचे प्रा.पी.टी.चव्हाण,भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड. पंडितभाऊ राठोड यांनी मनापासून आभार मानले आहेत.आज प्रत्येक बंजारा तांड्यावर साजरी होणार दिवाळी अनेक वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायती मागणी आज पुर्ण होत आहे, म्हणून तांड्यावरील बंजारा बांधवाला प्रचंड आनंद झाला आहे. आता तांड्यावरच्या युवकांना राजकीय पुढारी होण्यासाठी मार्ग मोकळा झाला असून सरकार कडून ग्रामपंचायतींना मिळणारा निधी थेट तांड्यांना मिळेल व उद्धस्त झालेला “तांडा” विकासाच्या दिशेने झेप घेईल,असा विश्वास मागील तीस वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी उपोषण रास्तारोको जेलभरो आंदोलन करणारे तसेच 2010 नंतर राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक, बंजारा तिर्थक्षेत्र बारा धामचे निर्माते प्रसिद्ध उद्योगपती किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावरील लढाई गतिमान करणारे बंजारा समाजाचे अभ्यासू व आक्रमक नेते प्रा.पी.टी.चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *