
पाच कोटी साठी अर्चना कुटेच्या भावाचे अपहरण
बीड स्थानिक गून्हे शाखेच्या पथकांने फिल्मी स्टाईल दोन आरोपी पकडले
बीड दि 26 ( वार्ताहार ) -द कुटे ग्रुपच्या मालक अर्चना सुरेश कुटे यांचा भाऊ असलेल्या शिवा घरत यांचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहारण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी मध्यरात्री दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.तसेच ( दि 25 रोजी ) दूपारी ही घटना घडली तसेच गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर तलवाडा फाटा या ठिकाणी फिल्मी स्टाईलने ट्रॅक्टर रोडला अडवे लाऊन दोन आरोपीच्या स्थानिक गून्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत व यामध्ये एक महिलाचा समावेश देखील असल्याचे समोर आले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यात आणि राज्यात यशस्वी उद्योजक म्हणून सुरेश व अर्चना कुटे यांच्याकडे पाहिले जाते. तिरुमाल प्रोडक्शनच्या माध्यमातून कुटे यांनी देशभरत नाव केले आहे. अर्चना कुटे यांचा भाऊ असलेल्या शिवा घरत यांचे काही जणांनी अपहरण केले. यानंतर बीड पोलीस ठाण्यात याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला. शिवा घरत यांच्या अपहरण प्रकरणात अर्चना कुटे यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. रात्री उशिरा यातील आरोपी असलेल्या पूजा देशभ्राता व अन्य एक जणाला तलवाडा फाट्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. प्रकरण गंभीर असल्यामुळे पोलिसांनी याचा तपास सावधगिरी बाळगून सुरु केला होता. आतापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून आणखीन काही आरोपीची नावे समोर येणार असल्याचे कळतं आहे. तसेच आमच्या ठेवी होत्या याप्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिला व अन्य एक आरोपीकडे विचारपूस केली असता त्या महिलेने आमच्या ज्ञानराधा बँकेत ठेवी होत्या. त्या मिळत नसल्यामुळे आम्ही शिवा घरत यांचे अपहरण करून पैसे मागितले. मात्र यावेळी थेट पाच कोटींची खंडणी मागितल्यामुळे हे प्रकरण फक्त ठेवीदारांचे नव्हते असं कळतं आहे. पोलीस गुप्तता पाळून याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.परंतू या अपहरणामागे नागपूर येथील सर्व आरोपी आहेत अशी देखील माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
याबाबदचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा