April 19, 2025

दहा पोलिस अधिकाऱ्यांना एसपीकडून नविन जबाबदारी 

 

बीड दि 24 ( वार्ताहार ) लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पोलीस दलात बदल्यांचे सत्र पार पडल्यानंतर आता अधिकाऱ्यांना नवीन ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांना पोलीस अधिक्षक यांच्याकडून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

    शिवाजी बंटेवाड यांना माजलगाव ग्रामीणमधून बीड ग्रामीण, बालक कोळी यांना मानव संसाधनमधून माजलगाव ग्रामीण, शीतलकुमार बल्लाळ माजलगाव शहरमधून बीड शहर, केतन राठोड शिवाजीनगर वरून माजलगाव शहर, अशोक मुदीराज वाहतूक शाखेतून पेठ बीड, गोरकनाथ दहिफळे परळी शहरवरून सिरसाला, भार्गव सपकाळ पाटोदावरून अंमलनेर, मधुसूदन घुगे शहर वाहतूक शाखेतून पिंपळनेर, चंद्रकांत गोसावी अंमलनेरवरून नेकनूर, सुभाष सानप आर्थिक गुन्हे शाखेतून जिल्हा वाहतूक शाखेत आले आहेत. सध्या पाच पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इतर अधिकाऱ्यांना लवकरच नवीन ठिकाणी नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *