May 4, 2025

चोविस तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृत्यूदेह सापडला

सावशेश्वर  गोदापात्रात घडली होती  घटना

 

गेवराई दि 11 ( वार्ताहार ) मजूराचे काम करण्यासाठी अंबड तालुक्यातील एक तरूण सावळेश्वर गोदापात्रात बूडाला होता सदरच्या तरूणाचा मृत्यूदेह पाण्यात सापडत नव्हता तसेच बीड व जालना येथील एनडीआरएफ तुकडीला पाचारन करण्यात आले होते चोविस तासांच्या प्रयत्नानंतर अखेर ह्या तरूणांचा मृत्यूदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,नबी हाबीब शेख ( वय 22 वर्ष ) राहनार ताडहादगाव तालुका अंबड जिल्हा जालना असे या मयताचे नाव असुन सदरचा तरूण हा आपल्या भावासोबत केनीवर मजूरी काम करण्यासाठी आला होता तसेच ( दि 10 रोजी ) संध्याकाळी काम संपल्यानंतर तो गोदापात्रात बूडाला काल पासुन गेवराई महसुल व पोलिस प्रशासनाच्या वतिने एनडीआरएफ बीड व जालना यांच्या तुकडीच्या मदतीने शोध कार्य सुरू होते तसेच आज ( दि 11 रोजी ) संध्याकाळी 6 च्या सुमारास यांचा मृत्यूदेह पाण्यातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे तसेच आज सकाळ पासुनच याठिकाणी पोलिस म महसुलचे प्रमूख ठाण मांडून होते व अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांनी देखील घटनास्तळावर भेट दिली तसेच मयताचे शव हे उत्तरीय तपासणीसाठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात आनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *