मंडळ आंधळे व तलाठी किरण दांडगे वर सदोष मनुष्य वधाचा गून्हा दाखल करा
गेवराई दि 11 ( वार्ताहार ) गोदाकाठच्या गावात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती प्रशासनाला न देऊन वाळू माफियांची पाठराखन करणाऱ्या तलाठी किरण दांडगे व मंडळ अधिकारी आंधळेवर सधोष मनुष्य वधाचा गून्हा दाखल करा कारण या म्हाळजपिंपळगाव सावळेश्वर हद्दीत एकजन बूडाला असल्याची माहिती आहे. तसेच हा केनीवर कामगार होता अद्याप यांचा मृत्यूदेह सापडला नाही
याबाबद सविस्तर माहिती अशी की,कालच अप्पर जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांनी याठिकाणी कार्यवाई करत मोठी कार्यवाई केली तसेच यादिवशीही वाळू उपसा सुरू होता मंडळ अधिकारी आंधळे व तलाठी किरण दांडगे यांच्या हद्दीत केनीवर काम करनाऱ्या मजूरांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ( दि 10 ) रोजी रात्री घडली असुन अद्याप पर्यंत मयताचे शव सापडले नाही तसेच यांचे नाव देखील कळाले नाही तसेच गोदाठाचे तलाठी व मंडळ अधिकारी याला जबाबदार आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो यांची माहिती ते वरिष्ठाना देत नाहीत किंवा व कामात हलगर्जिपना करत असतात एक खाजगी ईसम यांचा सर्व वाळूचा कारभार पाहत आहे अशी माहिती आहे तरी या घटनेला हे दोन महसुल कर्मचारी जबाबदार आहेत यांच्यावर सदोषमनुष्य वधाचा गून्हा दाखल करावा अशी मागणी होऊ लागली आहे