
गेवराई येथे व्ही.एम. कॅफे ऍण्ड फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ
गेवराई दि २८ (वार्ताहार ) शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या एन.के.कॅपिटल येथे विजय राठोड व रोहित ताराहर या तरुणांनी नव्याने सुरू केलेल्या व्ही.एम. कॅफे ऍण्ड फॅमिली रेस्टॉरंट या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उदघाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, गोर बंजारा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष रविकांत राठोड, शिवसेना युवा नेते यशराज पंडित, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, सचिव दिनकर शिंदे, माजी नगराध्यक्ष अमोल करांडे, प्रा.पी.टी. चव्हाण, गोर बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब राठोड, जीवन नवले, बबलू खराडे, कैलास राठोड, पत्रकार भागवत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून या हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर संचालक विजय राठोड व रोहित ताराहर यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी रविकांत राठोड, सपोनि संदीप काळे, यशराज पंडित, दिनकर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत विजय राठोड व रोहित ताराहर यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील मुंडे यांनी केले तर रोहित ताराहर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले