वाळूच्या पाच हायवा पकडल्या;अप्पर जिल्हाधिकारी यांची कार्यवाई
अंदाजे दिड ते दोन कोंटीचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि 10 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी केली जात होती तसेच गेल्या दोन दिवसांपुर्वी याठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी करीश्मा नायर यांनी गोदाकाठच्या गावांना भेटी दिल्या होत्या तसेच सावरगाव व सावळेश्वर परिसरातून अवैध भरून येनाऱ्या पाच ते सहा हायवा येडेश्वरी जवळ पकडल्या असल्याची माहिती आहे.तसेच या कार्यवाईत अंदाजे एक ते दिड कोंटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे.तसेच ही कार्यवाई (आज दि 10 रोजी) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केली आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या दोन दिवसांपुर्वी गोदाकाठच्या काही गावांत ग्रामसभे निमित्त अप्पर जिल्हाधिकारी करीश्मा नायर यांनी भेटी दिल्या होत्या तसेच परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत; पोलिस प्रशासनासह येडेश्वरी मंदिरा जवळ या गाड्या पकडल्या असल्याची माहिती आहे.सदरच्या कार्यवाईने वाळू माफियांचे धाबे दनानले आहेत तसेच ज्या हायवा गाड्या पकडल्या आहेत त्याच्यांवर यापुर्वीच देखील कार्यवाई झालेली आहे त्यांना दंड केल्यानंतर शासनाने यानंतर वाळू उपसा करनार नाही असे बंधपत्र तयार करूण घेतल्यानंतर ही या गाड्या अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे आता यामध्ये दंडात्मक कार्यवाई ऐवजी वाहन जप्तची कार्यवाई करायला हवी जेने करून वाळू माफिया पुन्हा असे करणार नाहीत व सदरची कार्यवाई सावरगाव व परिसरातील येडेश्वरी मंदिराजवळ करण्यात आली आहे सदरच्या कार्यवाईत ही अप्पर जिल्हाधिकारी करीश्मा नायर,तहसिलदार संदिप खोमणे,गौणखनिज अधिकारी माधव काळे,मंडळ अधिकारी सुनिल तांबारे,मंडळ अधिकारी अंगद काशिद ,सह अनेकजन सहभागी होते.