April 19, 2025

पाच लाखांत गेवराईचा तहसिलदार विकत घेतला

रेवकी मंडळअधिकारी बाळासाहेब पखाले चा पराक्रम

गेवराई दि 5 ( वार्ताहार ) तहसिलदार वाळूची एकही गाडी पकडणार नाही आणि स्वत;फिल्डवर येनार नाही वाळूच्या कोणत्याही कार्यवाईत हस्ताक्षेप करणार नाही प्रत्येक महिण्याला वाळूचे पाच लाख तहसिलदार संदिप खोमणे यांना दिले जातात आणि गेवराईचा तहसिलदार पाच लाखांत मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले यांने विकत घेतला असल्याची चर्चा संपुर्ण महसुल प्रशासनात दबक्या आवाजात सुरू आहे

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गंगावाडी,सावळेश्वर,म्हाळजपिंपळगाव, आगरनांदूर,राक्षसभूवन या परिसरात गेल्या एक महिन्या पासुन मोठ्या प्रगती पथावर वाळू उपसा सूरु आहे दररोज याठिकाणाहून शेकडो हायवा अनाधिकृत भरून जातात यांची संपुर्ण कल्पना गेवराईच्या महसुल विभागाला आहे तसेच यावर तोडगा काढण्याऐवजी यातून मालामाल कसे होता येईल.याकडे जास्त लक्ष महसुल प्रशासनाचे आहे आतापर्यंत वाळू विषयी एकही मोठी कार्यवाई तहसिलदार संदिप खोमणे यांनी केलेली नाही कारण त्यांना घरबसल्या पाच लाख रुपये यातून येत असल्याची माहिती आहे सगळे अवैध वाळू उपस्याचे कलेक्शन हे रेवकी मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले करत असल्याची माहिती आहे म्हणून गेवराईचे तहसिलदार वाळू विषयी कार्यवाई करत नाहीत कधी फिल्डवर येत नाही त्यांचे हेच कारण आहे आतापर्यंत गेवराई महसुल प्रशासनाकडे अवैध वाळू उपसा विरोधात ठोस पाऊले उचलले गेली नाही गेवराई तालुक्यात वाळू माफियाना महसुल प्रशासनाने मोकळीस दिली आहे असा बेजबादार तहसिलदार यांची उचलबांडी करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *