गेवराई दि 4 ( वार्ताहार ) शहरातील संजय नगर भागात एका घरामध्ये अवैध गर्भपात केला जात असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे सादर करण्यात आली होती त्याअंनुषगाने बीड जिल्हा शल्यचिकीत्सक व बीड स्थानिक गून्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने सापळा लाऊन याठिकाणी छापा मारला यामध्ये घटनास्तळावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले व एकजन फरार झाला या प्रकरणी गेवराई पोलिसांत तिघाविरोधात गून्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, सतिष बालासाहेब गवारे, राहनार शिक्षक कॉलनी जालना,मनिषा शिवाजी सानप राहनार अर्धमसला तालुका गेवराई जिल्हा बीड चंद्रकात ( बबण )पांडूरंग चंदणशिव राहनार संतोष नगर गेवराई असे या आरोपीची नावे असुन सदर या प्रकरणात मनिषा सानप ह्या महिलेवर यापुर्वी देखील अवैध गर्भपात प्रकरणात गून्हा दाखल आहे तसेच जामिनवर सुटल्यानंतर परत हा बेकादेशिर व्यावसाय सुरू केला तसेच यांची तक्रार गेल्या महिन्यात जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे यांच्याकडे करण्यात आली होती सदर प्रकरणात बीड स्थानिक गून्हे शाखा व एन्टी ह्यूमन पथक प्रमुख सपोनी सुरेखा धस यांच्या पथकाने डमी महिला याप्रकरणी पाठवून स्टिंग ऑपरेशन करत या प्रकरणाचा पडदा फाश केला तसेच याठिकाणी छापा मारल्यानंतर एक सोनोग्राफी मशीन ,गर्भपात करण्यासाठी वापरली जानारी औषधी व हत्यारे असे मिळून 3 लाख 32 हजार 90 रूपये ऐवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरच्या कार्यवाईमुळे गेवराई शहरात खळबळ उडाली होती तसेच ही कार्यवाई जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे,स्थानिक गून्हे शाखचे पोलिस निरीक्षक,सुरेश साबळे,एन्टी ह्यूमन पथक प्रमुख सुरेखा धस,वैधकीय अधिक्षक मोहमंद नोमानी,डॉ राजेश शिंदे ,डॉ गोपाल रादंड,प्रतिभा चाटे,मनिषा राऊत,चंदा मुळे,खरमाटे, मिरा सोनवणे,ढाकणे,शिंदे,पी टी चव्हाण,सतिष बहिरवाल,नारायण कोरडे,गणेश हांगे,सुनिल राठोड,निलेश जोशी,राजू काळे,सदाशिव माने,गणेश नाईकनवरे यांनी केली असुन या प्रकरणी वैधकीय अधिक्षक डॉ मोहमंद नोमानी यांच्या फिर्यादीवरून या तिघाविरोधात गेवराई पोलिसांत कलम 312,3,4,3(1),3(3),6(अ),6(ब)6(c)18,23(1),23(2),34भादवी नुसार गून्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उप अधिक्षक नीरज राजगूरू,पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष जंजाळ हे करीत आहेत.