राजा उदार झाला अन् गेवराई करांच्या हाती भोपळा दिला
अकृषी क्षेत्रात प्लॉटिंग करनाऱ्या विरूद्ध कार्यवाईला सुरूवात
गेवराई दि 3 ( वार्ताहार ) गेवराई शहरातील सर्वे नंबर 214 मध्ये अकृषी क्षेत्र आहे यामध्ये बनावट व खाजगी अभियंता याकडून लेआऊट तयार करून त्यांची बेकायदेशीर प्लॉटिंग विक्री करत असल्याची तक्रार गेवराई नगर परिषदेला दाखल करण्यात आली होती तसेच त्या अंनुषगाने गेवराई चे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी संबधीतांना नोटीस बजावली असल्याची माहिती असुन अनेकांना गंडा घालनारा राजा उदार झाला अन् गेवराई करांच्या हाती भोपळा दिला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई शहरा लगत अकृषी क्षेत्रात बिसमिल्ला कॉलणी च्या नावाने प्लॉटिंग टाकण्यात आली होती याला कुठल्याही विभागाची परवानगी नसतांना अशिक्षित लोकांना तोतयागिरी करून सदरचे प्लॉट विक्री केले जात होते अनेक जनाकडून प्लॉटच्या नावाने पैसे उकळले जात होते तसेच याठिकाणी नगर परिषदेचे आरक्षण असल्याकारणाने सदर जमिनीची खरेदी विक्री होत नाही हे माहित असतांना देखील याठिकाणी हा काळाबाजार सुरू होता या प्रकरणी गेवराई नगर परिषदेत लेखी तक्रार सादर करण्यात आली होती तसेच या तक्राची गांभिर्याने दखल घेऊन संबंधीतांना गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नोटीस दिली असुन सात दिवसांत आपणांकडे कुठल्या विभागाची परवानगी आहे त्यासंबंधीचे सर्वे कागदपत्रे आपण या कार्यलयात जमा करावी नसता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52,53 नुसार कार्यवाई करण्यात येईल असे या नोटीस मध्ये नुमूद आहे तसेच यामध्ये कुनीही खरेदी विक्री करू नये व दूय्यम निबंधक यांना या क्षेत्रात खरेदी विक्री होऊ नये या करीता पत्र देण्यात येणार असल्याची माहिती गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे.