April 19, 2025

अबब..! खळेगांवच्या ग्रामपंचात मध्ये लाखोंचा भष्ट्राचार |

सरपंच उपसंरपच यांच्यावर कार्यवाईची मागणी

 

गेवराई दि २८ ( वार्ताहार ) तालुक्यातील खळेगाव येथे 14 व्या वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, पाणीपुरवठा, शोषखड्डे, तसेच घरकुल मध्ये सरपंच मंडाबाई शेषेराव साळवे उपसरपंच निलावती अशोक काळे व ग्रामसेवक सुनिल सोनवणे यांनी संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार आनंद आहेर यांनी केली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की , खळेगाव येथे 14 व्या व 15 व्या वित्त आयोगातून लाखों रुपये शासनाने मंजूर केले होते परंतु, अनेक कामे बोगस व निकृष्ट दर्जाचे करून शासनाला गंडा घातल्याचा प्रकार समोर येत आहे. सरपंच मंडबाई साळवे, उपसरपंच निलावती काळे व ग्रामसेवक सुनील सोनवणे यांनी अनेक कामे न करताच संच्छालय , शोषखड्डे, न करताच कागदोपत्री दाखवून पैसे उचलले आहेत. ग्रामसेवक सोनवणे यांनी घरपट्टी च्या नावाखाली लाखो रुपये जनतेकडून गोळा करून ते पैसे शासनाच्या तिजोरीत जमा न करता स्वतःच्या खिसे भरले. अनेकदा तरुणांनी याविरोधात तक्रार केल्यावर गटविकास अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचा-याला पाठीशी घालण्याचे काम होतात. तसेच अनेक रस्त्यांची व सोलर लाईट हे इस्टीमेट पेक्षा कमी किंमतीचे बसवून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे गट विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तसेच सार्वजनिक संच्छालय बांधकामाध्ये निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले, तसेच त्याठिकाणी दरवाजे, लाईट न बसवताच त्याची बोगस बिले काढण्याचा प्रयत्न सरपंच मंडाबाई साळवे व उपसरपंच निलावती काळे हे करत असून तात्काळ ही बिले थांबवून संपूर्ण ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून तात्काळ कडक कार्यवाई करावी अशी मागणी तक्रारदार आंनद आहेर यांनी केली आहे.तसेच याप्रकरणी सरपंच , उपसंरपच व ग्रामसेवक यांना संपर्क होऊ शकला नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *