राजकीय शक्तीच्या दबावामुळे प्रशासनाने केला सोमनाथ राऊत यांचा खून?
गेवराई दि 21 ( वार्ताहार ) गेल्या तिन वर्षापासुन आपण ज्या कार्यलयात काम करतो त्याच ठिकाणी आपल्यावर अन्याय केला जातो अशी परिस्थिती निर्माण केली जाते की,ईच्छा असताना देखील मदत करता येत नाही परंतू हा कोणता अंहकार की एखाद्याचं कुटूंबच उदवस्त करायच हा मृत्यू नव्हे हा तर गेवराई नगर परिषदेच्या सुत्र चालवनाऱ्यांनी केलेला खून?आहे असे अनेकांचे म्हणने आहे.तसेच ही चर्चा संपुर्ण गेवराई शहरात सुरू आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई नगर परिषदेत स्वच्छता विभागात कार्यरत असनारे सोमनाथ राऊत यांच्यावर कार्यलयीन कामकाजात चुक केल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती त्यानंतर त्यांनी आपला लेखी खूलासा सादर केला परंतू तो खुलासा मान्य न करता कामात हलगर्जीपणा केला असल्याचा ठपका ठेवत त्यांना तिन वर्षापासुन सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते तसेच हा कर्मचारी आपल्यावर झालेल्या असमाधान कारक कार्यवाईमुळे त्रस्त झाला होता तसेच यांचे कुटूंब पुर्ण;तहा बिकट अवस्थेत आले होते याच नैराशातून तो व्यसनाधीन झाला परंतू कुणीही त्यांची मदत केली नाही काही दिवसापुर्वी त्यांची प्रकृती खालवली आणि त्यांच्यावर संभाजीनगरच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना आज (दि 21 रोजी) उपचारादरम्यान त्यांच निधन झाले तसेच मयत सोमनाथ राऊत यांच पार्थिव थेट नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालना समोर ठेवण्यात आले आणि त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला ही कोणती शक्ती होती तिने या कर्मचारी यांचा जिव घेतला हा मृत्यू नाही तर हा राजकीय दबावातून प्रशासनाने केलेला खून आहे अशी चर्चा सध्या गेवराई शहरात सुरू आहे.तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर मृत्यूदेह ठेवल्यानंतर थकीत वेतन आणि मयत सोमनाथ राऊत यांच्या मुलाला अंनुकंप तत्वावर घेण्यात येईल अश्या लेखी अश्वासना नंतर मयत सोमनाथ राऊत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तसेच या प्ररकरणी गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.