गेवराई दि 18 ( वार्ताहार ) शहरातील ईस्लामपुरा,सावतानगर भागात गेल्या एक महिन्यापासुन एका चोरट्यांच्या टोळीने धूमाकुळ घातला आहे ( दि 18 रोजी ) रात्री ही चोरट्यांची टोळी एक ईनोव्हा,आणि बूलेट गाडीवर आली होती यामध्ये स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतू एका नागरिकावर या चोरट्यांने चाकू हल्ला केला यामध्ये तो नागरिक बालबाल बचावला असल्याची माहिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई शहरातील सावता नगर व ईस्लापुरा बीड जालना हायवे वरून हाकेच्या अंतारावर आहे गेल्या काही दिवसापुर्वी याठिकाणी असनाऱ्या स्थानिक नगर सेवक व उद्योजक यांच्या दोन स्कॉर्पिओ चारचाकी गाड्या चोरट्यांनी पडळवल्या होत्या त्या जालना जिल्ह्यात सापडल्या असल्याची माहिती होती परंतू या एका गाडीला जिपीएस असल्यामुळे हा सगळा डाव फसला परंतू या गाडीत असनारे महत्वाची कागदपत्रे पसार करण्यात चोरट्यांना यश आले होते परंतू त्यानंतर पुन्हा काल मध्यरात्री अडीज व तिनच्या दरम्यान ही चोरट्यांची टोळी एक ईनोव्हा आणि बूलेटवर ईस्लामपुरा,व सावता नगर परिसरात आली व धूमाकुळ घालत होती परंतू स्थानिकच्या नागरिकांनी त्यांचा डाव हाणून पाडला आणि तब्बल एकतास चोरटे आणि स्थानिक नागरिक यांच्यात दगड फेक सुरू होती स्थानिक नागरिकांनी ही बाब पोलिसांना देखील कळवली परंतू याठिकाणापासुन गेवराई पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे एक पोलिस कर्मचारी देखील याठिकाणी फिरकला नसल्याने स्थानिकांनी पोलिसांचा विषयी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच स्थानिक नागरिक या घटनेच्या निषेधार्थ एक आंदोलन करणार असल्याची माहिती आहे तसेच हा प्रकार काय?आहे अश्या घटना याठिकाणी का?वारवार घडत आहेत याचा तपास पोलिसांनी करायला हवा अशी अपेक्षा याठिकाणच्या स्थानिक नागरिकांची आहे.