गेवराई उपजिल्हा रुग्णालय च्या असुविधा मुळे बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे धरणे आंदोलन
उपजिल्हा रुग्णालयाच्या असुविधे विरूद्ध आवाज उठविण्यासाठी सहभागी व्हावे – मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे
गेवराई दि 11 ( वार्ताहार ) गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय च्या असुविधा मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या असुविधे विरूद्ध बुधवार दि.13 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेवराई उपजिल्हा रुग्णालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी केले आहे.
गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे असुविधा असल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक श्री बडे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच विडिओ द्वारे कशा प्रकारे असुविधा आहेत ते मांडण्यात आले होते. जसे की क्ष-किरण मशीन बंद आहे, सोनोग्राफी मशीन बंद आहे, ट्रामा केअर युनिट बंद आहे, औषधी उपलब्ध नाहीत, डोळ्याचे मोजके ऑपेरेशन होत आहेत, साफसफाई होत नाही, निकृष्ट दर्जा जे चे जेवण दिले जात आहे, आणि डॉक्टर ओपिडी मध्ये बसत नाहीत, खासजी दवाखाना कडून कमिशन घेऊन रुग्णाची बेजारी काढत आहेत, तसेच बहुतांशी डॉक्टर खोट्या मेडिकल रजा तसेच नियमबाह्य गैरहजर राहतात या बाबत या निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. तसेच गेवराई उपजिल्हा रुग्णालयात स्वतः जाऊन या बाबत तेथील डॉक्टरांना व अधिक्षक यांना सांगितले होते. परंतु या दिलेल्या निवेदनाचा काहीच फरक उपजिल्हा रुग्णालयाला झाला नाही. तशाच असुविधेचा नाहक त्रास येथे येणाऱ्या रुग्णांना सहन करावा लागत असल्याने या असुविधे विरूद्ध बुधवार दि.13 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेवराई उपजिल्हा रुग्णालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून मनसे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्वांनी आंदोलनाला यावे असे आवाहन उपजिल्हा अध्यक्ष नीलकंठ वखरे, मनसे तालुका अध्यक्ष जयदीप गोल्हार, कृष्णा राठोड, सतीश पटाईत, अशोक नरवडे, विठ्ठल पट्टे, अशोक बेडके, जगन राऊत यांनी केले आहे.