January 22, 2025

महाराष्ट्रात पत्रकार, पोलिस व सफाई कामगार यांची आरोग्य तपासणी शिबिर राबविणारा वडवणी हा पहिला तालुका आहे – एस.एम.देशमुख

वडवणीत मराठी पत्रकार परिषद वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडवणी दि 3( वार्ताहार ) :- मराठी पत्रकार परिषदेचे वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आज 3 डिसेंबर रोजी पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर राबविले जाते परंतु पत्रकार, पोलिस व सफाई कामगार यांचे आरोग्य तपासणी शिबिर राबविणारा वडवणी तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रात पहिला तालुका आहे असे मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मयुरेश्वर हॉस्पिटल येथील आरोग्य तपासणी शिबिराच्या वेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सांगितले.मराठी पत्रकार परिषदेचे वर्धापन दिनानिमित्त 3 डिसेंबर रविवार रोजी वडवणी शहरातील डॉ.विजयकुमार निपटे यांच्या मयुरेश्वर हॉस्पिटल येथे पत्रकार,पोलीस कर्मचारी व नगरपंचायत कर्मचारी,सफाई कामगार यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष शेषेराव जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमन सिरसट, डॉ विजय कुमार निपटे,तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.दिनकर बोंगाने, डॉ.जगदिश टकले, राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ,प्राचार्य धुराजी राऊत, समाजसेवक युवराज शिंदे यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज शिंदे,डॉ विजयकुमार निपटे यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना सपोनि अमन सिरसट म्हणाले की मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका यांच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार, पोलिस कर्मचारी, नगर पंचायत कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम हा अत्यंत चांगला व कौतुकास्पद असून त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर नगराध्यक्ष शेषेराव जगताप म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा असुन पत्रकार यांनी समाजातील चांगले कामाचे बातमीचे माध्यमातून कौतुक करावे व समाजात घडणाऱ्या वाईट घटना या समाजापुढे लेखणीतून मांडुन नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे प्रमाणिकपणे काम करावे तसेच विकास कामांसाठी सहकार्य करावे व ज्या ठिकाणी भष्टाचार होत असेल त्याठिकाणी लेखणीतून आवाज उठवावा तसेच मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुक्याच्या वतीने जो आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला तो अत्यंत चांगला आहे.तसेच मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पत्रकार संरक्षण कायदा असेल किंवा इतर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आयुष्य घातले आहे. मराठी पत्रकार परिषद हि सन 1939 साली स्थापन झालेली देशातील मराठी पत्रकारांची पहिली संघटना आहे व यामध्ये गेल्या 10 वर्षांपासून पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर हे 3 डिसेंबर संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण 354 तालुका व 36 जिल्ह्यात राबविले जाते.यामध्ये गेल्या वर्षी 7 हजार पत्रकारांची एकाच दिवशी आरोग्य तपासणी शिबिरातुन करण्यात आली होती. यावर्षी 10 हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. पत्रकार हा समाजासाठी सदैव रस्त्यावर असतो व तो या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याची हि काळजी घेत नाही. पत्रकारांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही परिषदेच्या माध्यमातून अशा शिबिरांचे आयोजन करत असतो.तसेच मोठ्या आजाराच्या उपचारासाठी हि संघटनेचे माध्यमातून आर्थिक मदत व्हावी यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. सरकार पत्रकारांच्या वैद्यकीय उपचारांसाठी 2 लाख रुपये आर्थिक मदत करते परंतु ते मिळण्यासाठी पत्रकार यांना अडचणी येतात त्यामुळे सरकारवर अवलंबून न राहता संघटनेचे माध्यमातून पत्रकारांचा विमा काढणे तसेच आर्थिक 50 हजार रुपये पर्यंत मदत करण्याचा आमचा मानस आहे.असे ते म्हणाले.यावेळी या आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमात उपस्थित पत्रकार, पोलिस कर्मचारी, नगर पंचायत कर्मचारी यांची डॉ विजय कुमार निपटे, डॉ.बोंगाने , डॉ.जगदिश टकले यांनी मशिन व्दारे आरोग्य तपासणी केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे अनिल वाघमारे, वडवणी तालुका अध्यक्ष अँड विनायक जाधव, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर पोटभरे, सचिव सतिष सोनवणे, कोषाध्यक्ष शांतिनाथ जैन, पत्रकार धम्मपाल डावरे,संपादक ओमप्रकाश साबळे, पत्रकार अर्जुन मुंडे, पत्रकार महेश सदरे, पत्रकार हरिभाऊ पवार, पत्रकार शंकर झाडे, पत्रकार सतिष मुजमुले,पत्रकार वाजेद पठाण, पत्रकार अतुल जाधव, पत्रकार संभाजी लांडे, पत्रकार गीतांजली लव्हाळे मॅडम इत्यादींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिज्ञ विनायक जाधव यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार सतिष सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमाला पत्रकार, पोलिस कर्मचारी नगर पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *