January 22, 2025

राहूल गांधी याचं प्रकाश आंबेडकरांना पत्र 

 

 

मुंबई दि 25 ( वार्ताहार ) – वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर संविधान सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित असतील. या सभेचे निमंत्रण काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनाही देण्यात आले. परंतु काही कारणास्तव राहुल गांधी या सभेला उपस्थित राहू शकत नाही मात्र त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. 

राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, संविधान सन्मान सभेचे निमंत्रण दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने या मेळाव्याचे आयोजन केले त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेत. गेल्या ९ वर्षापासून घटनेच्या मुलभूत अधिकारांवर सातत्याने हल्ला होत आहे. आज देशात चिंताजनक स्थिती आहे. अशावेळी संविधानाचे संरक्षण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवाने सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे मी आजच्या सभेला उपस्थित राहू शकत नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या पुढील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत असं त्यांनी म्हटलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *