January 22, 2025

अबब..!बीडच्या आरटीओलाच दिली बनावट पीयुसी,तिघाविरूद्ध  फसवणूकीचा गुन्हा दाखल

 

बीड दि 22 ( वार्ताहार ) नुकतेच काही दिवसांपूर्वी अतिप्रदुषणामुळे दिल्लीमधील शाळा,कॉलेजेस बंद केले होते. यामुळे प्रशासनाने प्रदुषणाला कारणीभूत ठरणाऱ्या व धुराच्या धुळकंड्या सोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते. महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांत वाहनांची तपासणी न करताच वाहनाला पी.यु.सी प्रमाणपत्र दिले जाते. या पी.यु.सी केंद्राची कोणतीही तपासणी व त्यांना आरटीओंचा कसलाही धाक नसल्याने “व्हाटस् अँप फोटोवरून पी.यु.सी” ही योजना राज्यभर चालू असल्याचे दिसते.महाराष्ट्र आरटीओ चे अपर परिवहन आयुक्त यांनी अशा बोगस/बनावट पीयूसी चालकांवर तपासण्या करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, त्याअनुषंगाने बीडचे आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने यांनी स्वतः ग्राहक बनून बऱ्याच ठिकाणी अशा पीयुसी सेंटरवर ग्राहक बनून बनावट पीयुसी घेतल्या. गाडी चक्क बीडमधील वजनकाट्यावर आणि १०० किलोमीटर दुरून त्याच वेळी पीयुसी वाहनास व्हाटस् अँप वरून फोटो व पैसे घेऊन पीयुसी दिली. याबाबतचे व्हिडिओ सहीत स्टिंग ऑपरेशन गणेश विघ्ने यांनी केले.गुन्हा सिद्ध होण्यासाठी वाहनाचा वजनकाटा इनकॅमेरा केला. त्या अनुषंगाने पाठळशिंगी टोलनाक्यावरील या बनावट पीयुसी देणाऱ्याविरोधात वाहन क्रमांक MH04HP1821,MH11T7927 व MH23E9319 यांना बनावट पीयुसी दिल्याने बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पीयुसी केंद्र चालक परमेश्वर मेंडके ,करण घोडके,राहुल घोडके यांच्यावर भा.दं.वि मधील कलम ४२०,३४,४६८,४७१ मधील कलमानुसार शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबदचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *