January 22, 2025

पोलिस अधीक्षकांच्या पथकाने गेवराई तालुका बदनाम करण्याची सुपारी घेतली का?

१ लाख ४४ हजाराची वाळू जप्त केली आणि पाऊण कोटीचा अकडा झाला कसा?

 

गेवराई दि २१ ( वार्ताहार ) आज सकाळपासुन पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर यांचे पथक गेवराई तालुक्यात होते मात्र म्हाळजपिंपळगाव याठिकाणी या २४०० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे सदरील बाब अशी की पोलिस अधीक्षकांच्या पथकाकडून वारंवार गेवराई तालुका बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे या कार्यवाई वरूण जानवते .

याबाबद सविस्तर माहिती अशी की,पोलिस अधीक्षक पथकातील प्रमुख गणेश मुंडे वगळता काही कर्मचारी गेवराई तालुक्यात आले आणि म्हाळजपिंपळगाव याठिकाणी पडलेल्या वाळूवर कार्यवाई केली असल्याचे भासवून प्रसार माध्यमांना खोटी माहिती देत आहेत तसेच पोलिस अधीक्षक पथकाला वाळूसाठा जप्त करण्याचे कायदेशीर अधिकार आहेत का?हा मुळ प्रश्न आहे तसेच याठिकाणी ही २४०० ब्रास वाळू महसुलच्या ताब्यात देण्यात आला आहे तीची किंमत पाऊण कोटी रुपये दाखवण्यात आली आहे तीची खरी शासकीय किंमत प्रति ब्रास ६०० रुपये प्रमाणे १ लाख ४४हजार ऐवढी होते तसेच पोलिस अधीक्षक पथकातील वसुलीदक्ष एका आमलदारांने प्रसार माध्यमांना खोटी माहिती देऊन पाठ थोपटण्याचे जे कार्य सुरू आहे यावरूण असे दिसते की कूनाच्या सांगण्यावरूण पोलिस अधीक्षक पथकांने गेवराई तालुका बदनाम करण्याची सुपारी घेतली का?असा प्रश्न अनेकांना पडला असुन याबाबद पोलिस अधीक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांना संपर्क केला असता त्या कार्यवाईत कितीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी विचारणा केली असता त्याबाबद मला माहिती नसुन वायबसे नामक कर्मचारी यांना विचारा असे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *